Pune Raj Thackeray : खासगी कामाचा दौरा आटोपून राज ठाकरे आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता

वसंत मोरे यांनी कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात काल महाआरतीचे आयोजन केले होते. त्यावेळीही राज ठाकरे तेथे दिसले नाहीत. तत्पूर्वी दुपारी त्यांना विचारले असता, राज ठाकरे पुण्याला येत असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचे वसंत मोरे म्हणाले होते.

Pune Raj Thackeray : खासगी कामाचा दौरा आटोपून राज ठाकरे आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता
पुणे निवासस्थानी राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:20 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यातील आपल्या खासगी कामाचा दौरा आटोपून आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे. काल ते वैयक्तिक कारणास्तव पुण्याला आहे होते. ते पुण्यातील त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. तर उलट एक पत्रक प्रसिद्ध करून प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे म्हटले होते. पुण्यात येताच मनसैनिकांसाठी त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले होते. यात अयोध्या (Ayodhya) दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांशी कोणीही बोलू नये, अशा सूचना दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी काढलेल्या पत्रकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही बोलण्याचा शहाणपणा करू नये. त्यासाठी प्रवक्ते नेमलेले आहेत, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. आता हा रोख नेमका कोणाकडे होता, हे मात्र समजू शकले नसले, तरी वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरच तो असल्याची चर्चा सुरू आहे.

अयोध्या दौऱ्यावरून तापले आहे वातावरण

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून एकतर राज्यातले वातावरण ढवळून निघाले असताना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने अयोध्येत बॅनरबाजी सुरू केली आहे. असली आ रहा है, नकली से सावधान अशी बॅनर्स दिसून येत आहेत. तर भाजपाचे नेते, खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोवर हा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी टीव्ही नाइनच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.

वसंत मोरेंच्या कार्यक्रमास राज ठाकरे गैरहजर

वसंत मोरे यांनी कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात काल महाआरतीचे आयोजन केले होते. त्यावेळीही राज ठाकरे तेथे दिसले नाहीत. तत्पूर्वी दुपारी त्यांना विचारले असता, राज ठाकरे पुण्याला येत असल्याची कोणतीही कल्पना नसल्याचे वसंत मोरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.