Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर ; अयोध्या दौऱ्यापूर्वी घेणार सभा

उद्या शहर कार्यालयात होणार सदस्य नोंदणीला सुरुवात. अयोध्याच्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या मन सैनिकाची नावं नोंदवली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहेत. सकाळी 10 वाजल्या पासून अयोध्या दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे उद्यापासून दोन दिवशीय पुणे दौऱ्यावर ; अयोध्या दौऱ्यापूर्वी घेणार सभा
Raj ThackerayImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 3:48 PM

पुणे – अयोध्याच्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)पुण्यात सभा घेणार आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र पुण्यात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागण्यात आली आहे. येत्या 5  जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर(Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र त्याच्या या दौऱ्याला विरोधाचे ग्रहण लागले आहे.  उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. उत्तर भारतीय लोकांची माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश करून देऊ अशी भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्याचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर येणार असून पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत.

मनसेकडून जोरदार तयारी

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुण्यात मनसेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्या शहर कार्यालयात होणार सदस्य नोंदणीला सुरुवात. अयोध्याच्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या मन सैनिकाची नावं नोंदवली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहेत. सकाळी 10 वाजल्या पासून अयोध्या दौऱ्याच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे. उद्यापासून सुरु राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातूनही चर्चा

मनसे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अयोध्या दौऱ्याच्या नावनोंदणीला शुभारंभ करण्यात आयेणारा असल्याचे सांगण्यात आले होते. याबरोबरच या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातूनही चर्चा झाली.निवडणूक लक्षात घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कश्याप्रकारे काम केलं पाहिजे यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी सहभागी पदाधिकाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी ही ऐकून घेत त्यावर विचारविमर्श करण्यात आला. नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.