Raj Thackeray : आजच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, राज ठाकरेंच्या टार्गेटवर मुख्यमंत्री? वाचा सविस्तर

या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत.

Raj Thackeray : आजच्या राज गर्जनेला पुणे पोलिसांच्या 13 अटी, राज ठाकरेंच्या टार्गेटवर मुख्यमंत्री? वाचा सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 7:00 AM

पुणे : पुण्यात आजच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची जोरदार तयारी करण्यात आलीय. राज ठाकरेंची ही सभा (Pune MNS) गेल्या तीन सभांसारखीच वादळी होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांची बीकेसीत सभा पार पडली या सभेत त्यांनी राज ठाकरेंना पिक्चरमधल्या मुन्नाभाईची उपमा देत खिल्ली उडवली. तर बाळासाहेब झाल्यासरखे वाटणार अनेकजण सध्या फिरत आहे. कध हिंदुत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा, म्हणत राज ठाकरे यांना थेट डिवचलं होतं. त्यामुळे राज ठाकारे पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगिती केला. त्यावरही ते खुलेपणे बोलणार आहेत. या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांचा झालेला कडाडून विरोध आणि दौरा स्थिगित करण्याचे कारण या सभेत स्पष्ट होणार आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देताना तब्बल 13 अटी घातल्या आहेत. औरंगाबादेतल्या सभेलाही स्थानिक पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या मात्र यातल्या अनेक अटींचं पालन न झाल्याने राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला अटी काय?

  1. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत ही पहिली अट आहे.
  2. सभेत रुढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी ही दुसरी अट आहे.
  3. सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे, अशी तिसरी अट पुणे पोलिसांनी घातली आहे.
  4. कार्यक्रमात शस्त्र, तलवारी, बाळगू नये, तसेच कायदेशीर नियमांचं पालन व्हावं, असे पोलिसांनी बजावलं आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे.
  7. सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वयंशिस्त पाळावी, ही सहावी अट आहे.
  8. या सभेचे नियम पाळावे हे लोकांना कळवण्याची जबाबादारी ही आयोजकांवर असणार आहे.
  9. सभेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास, किंवा चेंगराचेंगरी झाल्यास याला आयोजक जबाबदार असणार आहे.
  10. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करता येणार नाही.
  11. व्यासपिठावरील संख्या ही निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
  12. स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
  13. कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका, वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  14. सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.