Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : राज ठाकरे यांच्या सभेनंतर पुण्याचं चित्र बदलणार, काय म्हणतात मनसे नेते

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर गुढी पाडव्याला राज ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेमुळे संपूर्ण पुणे शहरातील वातावरण राज ठाकरेमय झाले आहे. या सभेनंतर राज्याला नवी दिशा मिळणार आहे अन् पुणे शहराचे चित्र बदलणार असल्याचा दावा मनसे नेते करत आहेत.

Pune : राज ठाकरे यांच्या सभेनंतर पुण्याचं चित्र बदलणार, काय म्हणतात मनसे नेते
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 8:21 AM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. या सभेसाठी केलेला धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची पुण्यात देखील जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी मेगा प्लॅन तयार केला गेला आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर पुणे शहरातील चित्र बदलणार असल्याचा दावा मनसे नेत्यांकडून करण्यात आले आहे.

सभेसाठी पुण्यात तयारी

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यातून मनसेचे 20 हजार कार्यकर्ते मुंबईसाठी जाणार आहे, असे मनसे नेते बाबू वागस्कर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होत आहे. संपूर्ण पुणे शहरातील वातावरण राज ठाकरेमय झाले आहे. त्यामुळे या सभेनंतर राज्याला नवी दिशा मिळणार आहे अन् पुणे शहराचे चित्र बदलणार असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.

पुण्यातून १६० बसेस

पुणे शहर व जिल्ह्यातून 160 बसेस आणि दीड हजार चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी स्टिकर पुण्यातील कार्यालयात देण्यात आलेत. या सभेनंतर पुण्याचं चित्र बदलले असणार आहे, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या घरासमोर बॅनर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या घरासमोर परिसर झेंडे, बॅनरने पूर्ण सजला आहे. गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त आज शिवाजीपार्कवर राज ठाकरे यांची सायंकाळी होणार आहे. नवा संकल्प, नवी दिशा घेऊन आज राज ठाकरे आपल्या घरावर यशाची गुढी उभारणार आहेत. सकाळपासूनच त्यांच्या घरासमोर, घरावर फुलांच्या माळा लावून सजवले गेले आहे. सायंकाळी निघणाऱ्या शोभा यात्रेसाठी ट्रक ही सजल्या आहेत.

कोणावर साधणार निशाणा

राज ठाकरे यांचे भाषण नेहमीच चर्चेचे असते. त्यामुळे त्याची चर्चा काही दिवस होत असते. आता पाडव्याच्या सभेत सध्याची राजकीय परिस्थितीवर ते काय भाष्य करणार? यावर राजकीय अंदाज आखला जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावर राज काय बोलणार?, उद्धव ठाकरे यांना लक्ष करणार का? शरद पवार यांच्यांवर काय बोलणार? यासंदर्भात उत्सुकता आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.