MNS : लढायचं ते जिंकण्यासाठी, राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात नेमकं काय बोलणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात थोड्याच वेळात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील.

MNS : लढायचं ते जिंकण्यासाठी, राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात नेमकं काय बोलणार?
मनसेचा पुण्यात वर्धापन दिन सोहळा Image Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 5:29 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 16 वा वर्धापन दिन सोहळा पुण्यात थोड्याच वेळात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडणार आहे. राज ठाकरे आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून ते महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारानं लढाव्यात अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना देतील. राज ठाकरे चार दिवसांपासून पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते देखील आजच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. अमित ठाकरे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित असतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यात वर्धापन दिन सोहळ्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मनसेच्या वतीनं पुण्यात राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फलक लावण्यात आले आहेत.

राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित केला जाणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मनसेचा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. लढायचं ते जिंकण्यासाठी हा मंत्र राज ठाकरे मनसे सैनिकांना देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे संभाव्य भाजपसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे बोलतील. ओबीसी राजकीय आरक्षण, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मनसेची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारचा कारभार याबाबत राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागलंय. राज ठाकरे यांच्या भाषणा अगोदर माझे गाणे अक्षय गाणे या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

मनसेचं ट्विट

मुंबई बाहेर वर्धापन दिन सोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा आतापर्यंत मुंबईत होत होता. मात्र , राज ठाकरे यांनी यावर्षी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यात जोरदार तयारी सुरु केली होती. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात नियमितपणे पुण्याचे दौरे केले होते. 7 मार्चपासून राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असून आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या :

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.