परिवाराने साथ सोडल्यानंतर अजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात, थेट म्हणाल्या…

अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील.

परिवाराने साथ सोडल्यानंतर अजित पवारांसाठी बहीण निवडणूक मैदानात, थेट म्हणाल्या...
Rajani Indulkar and Ajit Pawar
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 12:18 PM

Rajani Indulkar and Ajit Pawar: बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्याचवेळी त्यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार याला निवडणूक मैदानात उतरवले आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत कुटुंबातील कोणीही नाही. परंतु त्यांच्या सावत्र बहीण रजनी इंदुलकर प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी एक दिवस अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाल्या रजनी इंदुलकर?

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रजनी इंदुलकर म्हणाल्या, अजित पवार नुसता बारामतीचा नेता नाही. ते महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांचे राज्यात नाही तर देशभरात नाव आहे. त्यांच्यासाठी माझा जीव तुटला. त्यामुळे मी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडले. अजित पवार कोणतीही गोष्टी किंवा काम करतात ते सर्वोत्तम करतात. ते खूप मेहनत करतात. सध्याची परिस्थिती पाहून त्यांना वाटत असेल या लोकांसाठी मी दिवस रात्र झटलो. पहाटेपासून रात्रीपर्यंत काम केले. कुटुंबाची पर्वा केला नाही. परंतु आज मला मते मागण्याची वेळ येत आहे. हे दुर्देव आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार

अजित पवार जेव्हा, जेव्हा मला नमस्कार करतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्यांना एक दिवस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचे मला पाहायचे आहे. त्यांच्यात ती पात्रता आणि गुणही आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी माझी अपेक्षा आहे, असे रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांनी बंडखोरी करत शरद पवार यांची साथ मागील वर्षी सोडली होती. त्यानंतर त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य अजित पवार यांच्याविरोधात गेले होते. त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. आता विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवारच अजित पवार विरोधात निवडणूक रिंगणात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.