Pune| पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम शिवजयंतीनंतर राजगड आणि तोरणा चकाचक ; पन्नास पोती प्लास्टिक कचरा केला गोळा

| Updated on: Feb 20, 2022 | 3:43 PM

शिवजयंतीनिम्मित वेल्हे तालुक्यातील राजगड आणि तोरणागडावर प्रथमच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि दुर्गप्रेमी संघटनांनकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दोन्ही गडावरील मिळून पन्नास पोती प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.

Pune| पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा उपक्रम शिवजयंतीनंतर राजगड आणि तोरणा चकाचक ; पन्नास पोती प्लास्टिक कचरा केला गोळा
Rajgad and Torna shine
Follow us on

विनय जगताप, पुणे- पुरातन विभाग आणि पुणे जिल्हाधिकारी(Collector of Pune) यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीनिम्मित वेल्हे तालुक्यातील राजगड (Rajgad)आणि तोरणागडावर( Torna) प्रथमच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि दुर्गप्रेमी संघटनांनकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . यामध्ये दोन्ही गडावरील मिळून पन्नास पोती प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आलाय.यामध्ये भोर-वेल्हा तालुक्याचे विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पुरातत्व विभागाचे कर्मचारी, भोर – वेल्हा पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि दुर्गप्रेमी संघटना सहभागी झाले होत्या.

शासकीय अधिकारी झाले सहभागी

पुरातन विभाग आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीनिम्मित वेल्हे तालुक्यातील राजगड आणि तोरणागडावर प्रथमच शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि दुर्गप्रेमी संघटनांनकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दोन्ही गडावरील मिळून पन्नास पोती प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.यामध्ये भोर-वेल्हा तालुक्याचे विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पुरातत्व विभागाचे कर्मचारी, भोर – वेल्हा पंचायत समिती कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि दुर्गप्रेमी संघटना सहभागी झाल्या होत्या.

शिवप्रेमी संघटनांचा  पुढाकार

स्वच्छता मोहोमेअंतर्गत किल्ले राजगडावरील पद्मावती देवी मंदिर परिसर, बालेकिल्ला, गुंजवणेकडून येणाऱ्या चोरमार्ग आणि पालवरून येणाऱ्या राजमार्गावरील कचरा गोळा केला. तर तोरणागडावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि तोरणजाई मंदिर परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा केला गेला. किल्ले स्वच्छतेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर सह्याद्री प्रतिष्ठान, गडकिल्ले संवर्धन समिती, सह्याद्रीचे दुर्ग सेवक, सह्याद्री गुंजन मावळ दुर्गरक्षक संघ ह्या शिवप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतला.

चुकीच्या पोलिओ डोसमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Politics | पहाटेचं सरकार पडलं तेव्हापासून BJPचा थयथयाट, Nana Patole यांचा टोला

Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी