‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद’, राजू शेट्टी म्हणतात, ‘सदाभाऊ खोत भुरटा माणूस’

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज एक वादग्रस्त विधान केलंय.

'राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद', राजू शेट्टी म्हणतात, 'सदाभाऊ खोत भुरटा माणूस'
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 5:01 PM

पुणे : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज एक वादग्रस्त विधान केलंय. ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद’ असं विधान त्यांनी केलंय. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘सदाभाऊ खोत भुरटा माणूस’, अशी खोचक टीका केलीय. त्यामुळे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात पुन्हा वाकयुद्ध रंगल्याचं चित्र आहे. पण राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावरुन नाही तर एफआरपीच्या मुद्द्यावरुन टीका केलीय. दोन्ही नेत्यांमध्ये एफआरपीच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी केली जातेय. “एफारपीचा विषय आम्ही विधानसभेत, विधानपरिषदेत मांडला म्हणून निर्णय झाला. त्याचं श्रेय राजू शेट्टी घेत आहेत”, अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला राजू शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

“सदाभाऊ खोत हा भुरटा माणूस. भुरटा माणूस काय बोलतो म्हणून मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही”, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

“मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एफआरपीबद्दल फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे. जर त्याचा शासन निर्णय झाला नाही तर आंदोलन करणार”, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.

हे सुद्धा वाचा

“एमएसपीसाठी ग्रामसमेत ठराव करून त्याची कागदपत्रे ट्रॉली भरून राष्ट्रपतींना पाठवणार”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद’, सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी पुण्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात एक वादग्रस्त विधान केलं. “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद आहेत. पाठीवर हात ठेवल्याशिवाय रेडे वेद बोलत नाहीत. त्याचप्रमाणे राज्यकर्तेही बोलत नाही. जिकडे जास्त डोकी तिकडेच राज्यकर्ते बोलतात, आणि तिथं नको ते बोलून जातात”, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं.

“आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकार कोणाचंही असलं तरी भ्रष्टाचार होतो. अभ्यास करणारा विद्यार्थी मागे रहातो, आणि पैसे देणारा विद्यार्थी पुढे जातो. बेरोजगारी हा विषय सरकारच्या अजेंड्यावर असला पाहिजे”, असंदेखील ते म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.