AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या, राजू शेट्टींची आक्रमक भूमिका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफआरपीच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. Raju Shetti sugarcane frp

कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या, राजू शेट्टींची आक्रमक भूमिका
राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 7:16 PM

सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी एफआरपी आणि वीज बिलाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. कोरोना गेला खड्यात, पहिल्यांदा एफआरपीचे पैसे द्या अशी भूमिका येथून पुढे आम्ही घेणार, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. विधिमंडळाचं सर्व अधिवेशन अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये गेले. बाकीचे प्रश्न नाहीत का, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. ( Raju Shetti warning Maharashtra Government over sugarcane frp and electricity bill issue )

मी महाआघाडी मध्ये आहे म्हणून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही असे नाही. या कोरोनाच्या काळात आम्ही शांत आहे. आता कोरोना गेला खड्यात पाहिले एफआरपीचे पैसे द्या, अशी भूमिका येथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सरकारला मंत्र्यांची दालन सजवायला पैसे

सरकारला मंत्र्याची दालन सजवायला पैसे आहेत आणि वीज ग्राहकाची वीज बिल माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. यासाठी आम्हाला आता रस्स्यावर उतरवावे लागेल, असा इशारा ही शेट्टी यांनी दिला.विधिमंडळाचे अधिवेशन हे मुकेश अंबानी यांच्याघराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरुन गाजले गेले.महाराष्ट्रात दुसरे कोण राहत नाही का? शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, वाढीव वीजबिल हे सर्व प्रश्न बाजूला राहिले, अशी टीका शेट्टी यांनी केली. जोपर्यंत सर्व सामान्य माणसामध्ये बदल होत नाही. तो पर्यंत हे बदलले जाणार नाही. सामान्य माणूस बोलला पाहिजे.तरच हे सर्व जण बदलतील, असेही शेट्टी म्हणाले.

वीज बिल प्रश्नी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. 19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असंही राजू शेट्टी म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाचीसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

( Raju Shetti warning Maharashtra Government over sugarcane frp and electricity bill issue )

कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.