AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे पवार आता कुठे आहेत? राजू शेट्टींचा सवाल, तर आजच्या निकालाबाबत म्हणतात…

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे आणि शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे पवार आता कुठे आहेत? राजू शेट्टींचा सवाल, तर आजच्या निकालाबाबत म्हणतात...
राजू शेट्टी
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 3:27 PM

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी नेते राजू शेट्टी सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी मैदानात असणारे राजू शेट्टी (Raju Shetty) केंद्र सरकारवरही तोफा डागत असतात. आता तर राजू शेट्टींनी थेट शरद पवारांवर (Sharad pawar) घणाघाती टीका केली आहे. शरद पवार पावसात भिजले त्यानंतर ढेकळं विरघळावी तसे विरघळून जाऊन शेतकऱ्यांनी मतं दिली, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेला घेऊन सरकार स्थानप झालं मात्र शेतकऱ्यांची काम झाली नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे आणि शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीने हुरळून जायचे कारण नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात ज्यांचं सरकार असतं त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. यावरुन राज्याचं सार्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडीने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असे सूचक विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.

रोहित पाटलांच्या विजयाबाबत काय म्हणाले?

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भाजपसह इतर राजकीय पक्षांना धोबीपछाड देत मोठा विजय प्राप्त केला आहे, यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, रोहितचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहितचा आदर्श घ्यावा, प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद , क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांच्या विजयावर त्यांनी दिली आहे.

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती

Nagar Panchayat Election result 2022: शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटील यांचं अभिनंदन

Goa Assembly Elections 2022 : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, गोव्यात आपचं भंडारी कार्ड चालणार?

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.