‘राहुल गांधी यांची दाढी आणि नरेंद्र मोदी यांची बॉडी’, रामदास आठवले कवितेतून व्यक्त

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख केलाय.

'राहुल गांधी यांची दाढी आणि नरेंद्र मोदी यांची बॉडी', रामदास आठवले कवितेतून व्यक्त
रामदास आठवले
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 7:55 PM

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा उल्लेख केलाय. यावेळी ते कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालेत. “राहुल गांधी जितनी बढानी है उतनी बढाओ दाढी, नरेंद्र मोदी की मजबूत है बॉडी”, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी कवितेतून राहुल गांधींवर निशाना साधलाय. रामदास आठवले यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर देखील भाष्य करत स्वत:ची भूमिका मांडलीय.

भारत जोडण्याची राहुल गांधींना गरज नाही. सत्तर वर्षे सत्ता असताना तुम्ही भारत जोडला नाही, असं म्हणायचं का? आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हाच भारत जोडलेला आहे, असं रामदास आठवले म्हणाले. “सबका साथ सबका विकास म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत मजबूत केलेला आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेस जोडा, तुम्ही जिथून पडलात तिथून निवडून. या तुमचा पक्ष वाढवा”, असं आवाहन त्यांनी काँग्रेसला केलंय.

‘निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीचा आदर करणारा’

“निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे गटाच्या बाजूने आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले ते लोकशाहीचा आदर करणारं आहे. यात लोकशाहीचा कुठेही अपमान नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताने आमदार आणि खासदार आहेत. उद्धव ठाकरेंकडे अगदी कमी मेजॉरिटी असल्यामुळे, निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे आणि त्याचे स्वागत करतो”, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘…तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती’

“शिवसेने भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. त्यावेळेस तुम्ही तिघे मिळून एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यावेळेस 105 आमदार असून सुद्धा भाजप विरोधी बाकावर बसली. त्यावेळी आम्ही बहुमताचा आदर केला. आणि तुम्ही सत्ता भोगली. त्यामुळे आता 164 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पाठीमागे असल्याने भाजप युतीचे सरकार आहे”, असं आठवले म्हणाले.

‘वंचितच्या युतीने फारसा फरक पडणार नाही’

“वंचित बहुजन आघाडीचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती झाली असली तरी, त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. कारण त्यांच्यामध्ये फार मतभेद दिसत आहेत. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटेंना वंचितने पाठिंबा दिलेला आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

“कसबा विधानसभा मतदारसंघातील वंचितची भूमिका आणखी स्पष्ट झाली नाही. त्यामुळे त्या युतीला जास्त महत्त्व द्यायचं नाही. आणि रिपब्लिक आठवले गटाचे आमचे सगळे कार्यकर्ते, घराघरात जाऊन या ठिकाणी हे प्रचार करत आहेत. आम्हाला विश्वास आहे की ते प्रचंड मताने निवडून येतील आणि संपूर्ण आमच्या पक्षाच्या पाठिशी आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.