Ramdas Athawale: आठवलेंनी दंड थोपाटले, येत्या 10 मे रोजी रिपाइंची राज्यभर निदर्शने

पुण्यात अल्पबचत भवन येथे रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीची काल बैठक पार पडली.

Ramdas Athawale: आठवलेंनी दंड थोपाटले, येत्या 10 मे रोजी रिपाइंची राज्यभर निदर्शने
: आठवलेंनी दंड थोपाटले, येत्या 10 मे रोजी रिपाइंची राज्यभर निदर्शनेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 5:50 PM

पुणे: राज्य सरकार मध्ये मागासवर्गीयांचे नोकरीमधील अनुशेष भरून काढावा, भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन द्यावी, 2019 पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी, प्रमोशनमध्ये एससी एसटी वर्गाला रिझर्वेशन (reservation) देण्यात यावे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण (obc) लागू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या 10 मे रोजी राज्यभर सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने, मोर्चे आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी मोहीम पूर्ण करून येत्या 15 जून पर्यंत सभासद शुल्क पक्षाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात जमा करण्यात यावे, असा अंतिम आदेशही आठवलेंनी दिला.

पुण्यात अल्पबचत भवन येथे रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीची काल बैठक पार पडली. याप्रसंगी रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश महातेकर, भुपेश थुलकर, राजा सरवदे, बाबुराव कदम, पप्पू कागदे, हनुमंत साठे, विवेक कांबळे, परशुराम वाडेकर, हेमंत रणपिसे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत अल्टीमेटम देऊन त्यानंतर माशिदींवरील भोंगे जबरदस्ती काढण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानन्तर दादागिरी करणे काय राज ठाकरेंनाच जमते का? असा सवाल करीत त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या भूमिकेचा आपण तात्त्विक विरोध केला आहे. मात्र आता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या चुकीच्या भूमिकेचा कृतीशील विरोध करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

कृतीशील विरोध करा

जिथे मशिदींवरील भोंगे जबरदस्ती काढले जात असतील तिथे मुस्लिम बांधवांच्या पाठीशी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी उभे रहावे. जिथे हिंदू बंधवांवर अन्याय होईल तिथे हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढे यावे. देशात हिंदू-मुस्लिमसह सर्व धर्मियांमध्ये सौहार्द बंधुत्व टिकविण्यासाठी राज ठाकरे सारख्यांच्या फुटीर भडकावू आणि भेदभावजनक समाजात दुही पाडणाऱ्या भूमिकेचा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कृतिशील विरोध करावा, असे आवाहन आठवले यांनी केले आहे.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.