AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचारसभेत रामदास आठवले यांची कवितेतून फटकेबाजी; म्हणाले, “मी देत आहे राष्ट्रवादीला…”

नरेंद्र मोदी आहेत साऱ्या विरोधकांचे बाप, का निवडून येणार नाहीत अश्विनी जगताप. देवेंद्र फडणवीस आणि मी हातात घेऊन आलो जय भीम आणि जय महाराष्ट्रची काठी, कारण आम्ही दोघे आहोत अश्विनीताईंच्या पाठी.

प्रचारसभेत रामदास आठवले यांची कवितेतून फटकेबाजी; म्हणाले, मी देत आहे राष्ट्रवादीला...
रामदास आठवले
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 4:59 PM

पुणे : कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या प्रचारासाठी रॅली काढली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून चांगलीचं फटकेबाजी केली. रामदास आठवले यांची फटकेबाजी – मी देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी जगताप. नरेंद्र मोदी आहेत साऱ्या विरोधकांचे बाप, का निवडून येणार नाहीत अश्विनी जगताप. देवेंद्र फडणवीस आणि मी हातात घेऊन आलो जय भीम आणि जय महाराष्ट्रची काठी, कारण आम्ही दोघे आहोत अश्विनीताईंच्या पाठी.

राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी आलो

रामदास आठवले म्हणाले, आम्ही देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सर्व आलो ते राष्ट्रवादी काँग्रेसचा बदला घेण्यासाठी. आम्ही जात आहोत अश्विनीताईंना निवडून देण्यासाठी. लक्ष्मण जगताप यांचा पिंपरी चिंचवडला मोठं बनवण्यात वाटा आहे. जगताप हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. आजारी पडले. त्यावेळी रुग्णालयात भेटलो. जगताप आपल्यात राहू शकले नाहीत. विधानसभेत त्यांनी पिंपरी चिंचवडची बाजू मांडली होती. दलित, बौद्ध समाजाशी चांगले संबंध होते.

राहुल गांधी यांची गाडी कशी चालेल?

अचानक अशी वेळ आली. अचानक निवडणूक लागली. बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. पण, अजित पवार यांनी होऊन जाऊ द्या म्हटलं. त्यामुळं ही निवडणूक होत आहे. मतदान करण्याचा आपणाला अधिकार आहे. नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारे नेते आहेत. सबका साथ, सबका विकास अशी भूमिका मांडणारे नरेंद्र मोदी आहेत. पीएम बनण्यासाठी बरेच जण आहेत. देशाची नाडी नरेंद्र मोदी यांना माहीत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची गाडी त्यांच्यासमोर कशी चालेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

2024 मध्ये भाजपप्रणित एनडीएचे सरकार येणार आहे. कितीही शिव्या द्या. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. त्यानंतर मी झालोच. देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलचं एक हजार कोटींच स्मारक, बाबासाहेबांचा पुतळा, हॉल, मेडिटेशन सेंटर अशा अनेक सुविधा असणारे स्मारक होणार आहे, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.