पुणेकरांच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर रंगला ‘ओपन स्ट्रीट मॉल’ ; महापौरांनीही केले ट्विट
शहारात खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर 'ओपन स्ट्रीट मॉलचं' आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी10 ते सायंकाळी 4 पर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. 'ओपन स्ट्रीट मॉलमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसची वळवण्यात आल्या आहेत.
पुणे – पुण्यातील अत्यंत वर्दीळीचा , सातत्त्याने माणसांच्या गर्दीने गजबजून गेलेला, वाहनांच्या कोंडीमुळे गुदमरलेला लक्ष्मी रोड आज चक्क मोकळा श्वास घेत होता. लक्ष्मी रोडवर आज वाहनांची गर्दी नाही, वाहतूक कोंडीही नाही. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना कोणत्याही वाहतूक कोंडीला सामोरे न जात मनोसक्त खरेदीचा आनंद घेता येणार आहे. यासगळ्याचे निमित्त आहे पादचारी दिनाचे पादचारी दिनानिमित्त शहारात खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर ‘ओपन स्ट्रीट मॉलचं’ आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी10 ते सायंकाळी 4 पर्यंत खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ‘ओपन स्ट्रीट मॉलमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसची वळवण्यात आल्या आहेत. यासकाळपासून सायंकाळपर्यत नागरिकांना विना त्रास खरेदीच आनंद लुटता येणार आहे.
अशी केली तयारी ‘ओपन स्ट्रीट मॉलसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रंगरंगोटी करण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी शोभेवंत फुलदाण्या ठेवून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कागदी पताक्याच्या माळा लावण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी रांगोळी रेखीव सजावट करण्यात आली आहे.
महापौरांनी केले ट्विट ‘ओपन स्ट्रीट मॉलबाबत शहराचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी ‘सुप्रभात : लक्ष्मी रस्त्यावर आजच्या पुणे महापौर पादचारी दिनाच्या निमित्ताने केलेली तयारी’ असे म्हणत तयारीचा फोटो टाकत ट्विट केल आहे.
सुप्रभात : लक्ष्मी रस्त्यावर आजच्या पुणे महापौर पादचारी दिनाच्या निमित्ताने केलेली तयारी !#पुणे_महापौर_पादचारी_दिन #punemayorpedestriansday #pune_mayor_pedestrians_daydev pic.twitter.com/LjCwHhoTpY
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 11, 2021