पुण्यात प्रचंड खल, अखेर रविकांत तुपकर यांची सर्वात मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट येणार

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली.

पुण्यात प्रचंड खल, अखेर रविकांत तुपकर यांची सर्वात मोठी घोषणा, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट येणार
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 4:23 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या वादळ आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक वर्ष काम करणारे नेते रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि रविकांत तुपकर यांचा काहीच संबंध नसल्याचं जालिंदर पाटील म्हणाले होते. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. रविकांत तुपकर यांनी ट्वीट करत आपल्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली होती. आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही धक्कादायक आहे, असं रविकांत तुपकर म्हणाले होते. यानंतर आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची आणि आगामी धोरणांबाबत मोठी घोषणा केली.

आमदार रविकांत तुपकर यांनी आता मोठी घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर रविकांत तुपकर यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवण्याचं ठरलं. या बैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली.

तुपकर यांच्याकडून मोठी घोषणा

रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं ठेवलं आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी संघटना बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. राज्यातील तिसरी आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

रविकांत तुपकर भावनिक

रविकांत तुपकर यांनी बैठकीपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ते प्रतिक्रिया देताना भावूक झाले होते. “स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कोल्हापूर जिल्ह्यात एका तालुक्यापुरती होती. आम्ही तिला राज्यात पोहोचवली. स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना वाटलं की ते कारवाई करतात. त्यांनी आधी सदाभाऊ खोत यांना काढलं, नंतर देवेंद्र भुयार यांना काढलं. आता आज माझा नंबर आहे. छोट्या पक्षांचे नेते खूप असुरक्षित असतात. माझा असा काय गुन्हा होता की माझ्यावर कारवाई झाली? राजू शेट्टी यांना माझ्यावर कारवाई करुन सुखाची झोप लागली असेल. त्यांच्या वाटेतला काटा दूर झाला, असं त्यांना आता वाटत असेल. आम्ही २२ वर्ष लाल बिल्ला घराघरात पोहचवण्याचं काम केलं”, असं रविकांत तुपकर म्हणाले. यावेळी ते भावनिक झाले. “मला पदासाठी करायचं असतं तर मागेच मला भाजप उमेदवारी देणार होतं. पण मी गेलो नाही. आज बैठक होत आहे. बैठकीत ठरवू काय कारायचं ते”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.