विद्यार्थी म्हणतो शिक्षकांनी मारहाण केली, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खरा प्रकार समोर, महाविद्यालयाची पोलिसात तक्रार
पिंपरी चिंचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या विद्यार्थ्याने स्वतःचे डोके फोडल्याचे समोर आले आहे.
पुणे : पिंपरी चिंचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या विद्यार्थ्याने स्वतःचे डोके फोडल्याचे समोर आले आहे. तसे महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. विद्यार्थ्याने स्वत:चे डोके आपटून घेत स्वत:ला जखमी केले, असा दावा यापूर्वीदेखील महाविद्यालय प्रशासनाने सांगितले होते.
नेमका प्रकार काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील शुभम कैलास बारुट हा विद्यार्थी कम्युनिकेशनचे शिक्षण घेतो. त्याने राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार फी घ्यावी असं माहाविद्यालय प्रशासनाला सांगितलं होतं. त्यानंतर मला शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला होता. या विद्यार्थ्याचे नाव शुभम कैलास बारुट असं असून तो 23 वर्षाचा आहे.
विद्यार्थ्याने डोकं आपटून घेत स्वत:ला केलं जखमी
विद्यार्थाने मला शिक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. या सर्व प्रकरणानंतर आता विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी मारहाण झाल्याचा आरोप केला जात होता, त्याच दालनातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजनुसार विद्यार्थी मारहाण प्रकरणाला वेगळं वळण आल्याचं दिसतंय. विद्यार्थ्यांनेच प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आणि स्वतःचे डोके आपटून केले स्वतःला जखमी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे.
महाविद्यालय प्रशासनाने केली रितसर तक्रार
विशेष म्हणजे स्वत:चे डोके आपटून घेत हा विद्यार्थी पळून जात होता. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विद्यार्थ्याने केलेल्या आरोपानंतर आता महाविद्यालयाने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इतर बातम्या :
अजितदादा, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता, अनिल परबांचा का नाही?, नितेश राणेंचा सवाल
Video | क्लीनअप मार्शलची दादागिरी, हातात दगड घेऊन वसुली, भांडणाचा व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/lHgfi774uC#viral | #ViralVideo | #BMC | @mybmc | #Mumbai | #corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 29, 2021
(rayat shikshan sanstha pune mass communication college student alleges beaten by teacher now cctv shows he injured himself collage register police case)