अभिजित पोते, पुणे, दि.23 डिसेंबर | पुणे शहराचा विकास वेगाने सुरु आहे. विविध प्रकल्प पुणे शहरात येत आहे. यामुळे पुण्याचे महत्व देशभरात नाही तर जगभरात वाढत आहे. पुणे शहरासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्ग आहेत. परंतु पुणे शहराला स्वतंत्र विमानतळ नाही. लष्कराचा लोहगाव विमानतळाचा वापर पुण्यासाठी केला जातो. यामुळे पुरंदरमध्ये नवीन विमानतळ उभारण्याचा हालचाली वेगाने सुरु आहे. त्याचवेळी पुणे लोहगाव विमानतळाने अनोखा विक्रम केला आहे. पुणे शहरातून ऑक्टोंबर महिन्यात विक्रमी विमानफेऱ्या झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरून 5 हजार 481 विमान फेर्या झाल्या आहेत.
पुणे विमानतळावरून विमान उड्डाणमध्ये मोठी वाढ झाला आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरून 5 हजार 481 विमान फेर्या झाल्या आहेत. केवळ एका महिन्यात 7 लाख 80 हजार 618 प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणारा प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. व्यापार, कार्यालयीन कामे, पर्यटन यासारख्या कामांसाठी पुणे विमानतळावरून प्रवास वाढला आहे.
पुणे विमानतळावरून दिवसाला 180 विमानांचे उड्डाण होते. पुणे विमानतळावरून दररोज सरासरी 90 विमाने जातात आणि तितकीच विमाने पुण्यात येतात. अशी एकूण 180 विमानांची नोंद पुणे विमानतळावर होत असते. पुणे शहरातून देशातील विविध भागांत विमाने जातात. परंतु आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुण्यातून नाही. यामुळे पुणे शहराजवळ पुरंदर येथे नवीन उभारण्याच्या हालचाली सुरु आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. विमानतळासाढी जमीन संपादनाचे काम सुरु होणार आहे.
पुणे लोहगाव विमानतळावर नुकतेच नवीन टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. नवीन टर्मिनलसाठी 525 कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यात पाच एरोब्रिज तयार केल्यामुळे टेकऑफ आणि लॅण्डींगच्या आणखी सुविधा तयार झाल्या आहेत. यामुळे नवीन टर्मिनलवरुन रोज 120 विमाने जाणार आहेत.