राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल
पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदली राजकीय हेतूने झाल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे (Rahul Dambale) यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) यांची बदली राजकीय हेतूने झाल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे (Rahul Dambale) यांनी केला आहे. ही बदली अन्यायकारक आणि चुकीची असून महानगरपालिका निवडणूक लक्षात घेऊन केलेली बदली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना मेलद्वारे त्यांची बदली करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. परंतु महानगरपालिका निवडणूक (PMC Election) लक्षात घेता आणि निःपक्षपाती कारवाई होण्याचा फटका बसू शकतो, या धास्तीने ही बदली केल्याचे डंबाळे यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे जनमत हे कृष्ण प्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे आहे. सरकारने याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये, अशी विनंती राज्य सरकारकडे करीत आहोत, असे डंबाळे यांनी सांगितले आहे.
20 एप्रिलला झाली बदली
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. त्यांची 20 एप्रिलला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार नुकताच स्वीकारला. त्यांच्यासह मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
का रद्द करावी बदली?
गुन्हेगारांना अद्दल घडवण्यात पटाईत असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. कारण एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी केलेल्या एका कृतीची बरीच चर्चा होती. त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा चांगलाच चर्चेत होता. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचे धोरणही अनेकांना आवडले होते. त्यासाठी त्यांनी कृष्ण प्रकाश यांनी स्वत:चा मोबाइल क्रमांकदेखील सार्वजनिकरित्या सांगितला होता. त्यामुळे त्यांचा लोकसहभागही वाढला होता. मात्र काही कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना खटकल्याच्या चर्चा होत्या. काही वेळेला ते वेशांतर करून गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा आपल्याच हद्दीतील पोलिसांचा कारभार पाहण्यासाठी पोहचत.
#Pune : पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली राजकीय हेतूनं झाली असून ती रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलीय.@Krishnapips #politics #punenews #Police अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/CvXuof0ER7
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2022