‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, ब्राह्मणांनी आरक्षणाला विरोध करु नये’, शरद पवारांनी टोचले ब्राह्मण संघटनांचे कान
एकूणच या बैठकीत झालेल्या चर्चेत अस्वस्थता हा मुद्दा सोडल्यास ब्राह्मण संघटनांच्या हातात फारसं काही पडलेलं नाही. ब्राह्मण समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली म्हणून बैठक बोलावली होती. असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
पुणे – ब्राह्मणांना (Brahmins)सध्याच्या स्थितीत आरक्षण (reservation)देता येणार नाही, आणि त्यांनीही इतर समाजाचे आरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी करु नये, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी ब्राह्मण संघटनांचे कान टोचले आहेत. राज्यातील नऊ–दहा ब्राह्मण संघटनेच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याचे पवारांनी सांगितले. या बैठकीत ब्राह्मण समाजात असलेली अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही राजकीय हेतूसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. असेही स्पष्ट करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी भेटण्याची वेळ मागितली म्हणून त्यांना भेट दिली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या बैठकीत तीन विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत तीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे शरद पवारांनी सांगितले.
१. ब्राहमण समाजातील अस्वस्थता
पवार म्हणाले – ब्राह्मण समाजात एक अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या काही सहकाऱ्यांनी विधाने केली त्याबाबतची अस्वस्थता होती, सांगितले की विधाने केल्यानंतर आमची पक्षात चर्चा झाली, पुन्हा अशा पद्धतीने जाती, धर्माविरोधात बोलू नये, अशा सूचना देण्यात आलेली आहे. धोरणांवर टीका केली जाईल. त्यानंतर याबाबत ब्राह्मण समाजानेही फार आग्रह केला नाही, असेही त्यांनी सांगितले. या पदाधिकाऱ्यांवर काहीही कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२. ब्राह्मणांना आरक्षण शक्य नाही
अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे साहजिकच सर्व्हिस सेक्टर, नोकरीत अधिक संधी मिळायला हवी. ब्राह्मणांना आरक्षण असावं, अशी ब्राह्मण संघटनांची भूमिका आहे. मात्र सद्यस्थितीत ब्राह्मणांच्या आरक्षणाचं सूत्र बसेल असं वाटत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. असे असेल तर आरक्षण कुणालाच देऊ नका, ही भूमिका मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र समाजात अनेक जाती धर्म हे मागासलेल्या स्थितीला आहेत, त्यांना प्रगतीसाठी, आपल्यासोबत आणण्यासाठी आऱक्षण द्यावं लागेल. असेही पवारांनी सांगितले. आरक्षणाला विरोध करु नये, असेही या बैठकीत पवारांनी स्पष्ट केले.
३. परशुराम महामंडळाचेही आश्वासनच
विविध समाजासाठी व्यवसायांसाठी ज्या प्रकारे इतर राज्यांत महामंडळ असते, त्याप्रमाणे राज्यातही ब्राह्मणांसाठी महामंडळ असावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. परशुराम महामंडळ असं त्याचं नावही सुचवण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं. याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. हे राज्य सरकारबाबतचे प्रश्न आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंती करुन त्यांच्यासोबत एक दीड महिन्यांत बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.
ब्राह्मणांच्या पदरी निराशाच
एकूणच या बैठकीत झालेल्या चर्चेत अस्वस्थता हा मुद्दा सोडल्यास ब्राह्मण संघटनांच्या हातात फारसं काही पडलेलं नाही. ब्राह्मण समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली म्हणून बैठक बोलावली होती. असेही शरद पवारांनी स्पष्ट केले. राज्यात वातावरण खराब झालेलं नाही. जबाबदार राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानाने अस्वस्थता येऊ शकते, जाणकरांनी याची काळजी घ्यावी आमि ही अस्स्थता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे पवार म्हणाले.