Rohit Patil | रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत
रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेची आहेत. त्याचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी संधी दिली नसेल मात्र वय झालं की पक्ष विचार करेल. पक्ष येत्या काळात संधी देईल हा मला विश्वास आहे. रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी
सांगली – कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना विरोधकांना धूळ चारत 23 वर्षीय रोहित पाटीलने एकहाती सत्ता मिळवली. या विजयाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत असताना रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद लवकर मिळण्याची चर्चा सांगलीत जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे राष्ट्रवादीचे कर्जत -जामखेडचे आमदार आमदार रोहीत पवार यांनी याबाबत संकेत दिले आहे.
‘रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेची आहेत. त्याचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी संधी दिली नसेल मात्र वय झालं की पक्ष विचार करेल. पक्ष येत्या काळात संधी देईल हा मला विश्वास आहे. रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी असे मत व्यक्त करत आमदार रोहीत पवार यांनी रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद बद्दलचे मोठे संकेत दिले आहेत.
प्रस्थापितांना दिला धक्का
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहितने राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत या नगरपंचायत निवडणूकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झालीच. या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढले आहे. अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत कवठेमंकाळ नगरपंचायतची सत्ता एकहाती ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहितवर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठीच युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा जोरदार पने सांगली जिल्ह्यात सध्या सुरू आहे.
पक्ष मजबूतीसाठी जबाबदारी देणार स्वर्गीय आर. आर.पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळलेली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात आबा चे फार मोठे योगदान होते. रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूक जिकून एकहाती सत्ता प्रस्थापित केलेने राज्यातून रोहित पवार सह अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला थांबवायचे असेल तर युवकांना पक्षात आणून पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी रोहित पाटील यांच्याकडे मोठी जवाबदारी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष पद आणि विधानसभे ची उमेदवारी लवकरच मिळणार आहे. असले ची चर्चा सध्या राज्यात आणि सांगली जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात जोरदार सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार, शरद पवारांचं दिपाली सय्यद यांना आश्वासन
औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर शिवसेना भाजप युतीचा झेंडा