राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर मोठा आरोप; म्हणाले, तुमच्या पक्षाने…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीतील मोठा भाऊ आहे, असा दावा केला होता. अजितदादा यांच्या या भूमिकेचं रोहित पवार यांनी समर्थन केलं आहे. अजितदादा आकड्यांवर बोलत असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर मोठा आरोप; म्हणाले, तुमच्या पक्षाने...
prakash ambedkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 11:59 AM

पुणे : प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मात्र अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होऊ नये यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षानं मागच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मते खाल्ली. त्यामुळे भाजपचे 7 खासदार आणि 22 आमदार निवडून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मनभेदही नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे. महाविकास आघाडी त्याच भूमिकेने काम करत आहे. भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे, नाहीतर जनता आपल्यालाही सोडणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच मोठा भाऊ

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ आहे, असं विधान राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार आकड्यांवर बोलतात. आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे जास्त आमदार आहेत. शरद पवार मोठे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभव पाहता अनुभवाने राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे. त्याचा अर्थ असा नाही की आम्ही जास्त जागा मागणार किंवा कमी मागणार. मात्र राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे असं म्हणणं योग्य आहे, असंही ते म्हणाले.

राज्यात कमिशन रेट

यावेळी रोहित पवारांनी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केला. राज्यात 50 टक्के कमिशनचा रेट सुरू आहे. पैसा कोणापर्यंत जातो माहिती नाही. मात्र राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी हे पैसे वापरले जातात. पैसे खिशातून जात नाही. कुठून येतात याचा अंदाज आता सामान्य लोकांना आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

ते सत्याच्या बाजूने आले

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती. या प्रकरणात बाहेरच्यांनी लक्ष घालू नये. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांवर तो प्रश्न सोपवा, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. ते आता सत्याच्या बाजूने आले आहेत, असं पवार म्हणाले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.