Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमवत्या व्यक्तीच्या निधनामुळे निराधार झालेल्या महिलांना ‘आधार’; रोहित पवार देणार रोजगार

कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाला गमवावं लागलेल्या महिलांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार धावून आले आहेत. (rohit pawar measures to support families who lost earning member to Covid)

कमवत्या व्यक्तीच्या निधनामुळे निराधार झालेल्या महिलांना ‘आधार'; रोहित पवार देणार रोजगार
rohit pawar
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 10:36 AM

पुणे: कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाला गमवावं लागलेल्या महिलांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार धावून आले आहेत. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे या महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (rohit pawar measures to support families who lost earning member to Covid)

कोरोनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेकांच्या घरातील कमवत्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक महिला तसेच घरातील वयोवृध्द व्यक्ती निराधार झाले आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून विविध निर्बंध घालण्यात आल्याने काही भागात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या निराधार महिलांना घरबसल्या रोजगार देऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याकरिता रोहित पवार हे त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांना शिलाई मशीन व पीठ गिरणी किंवा इतर छोटा घरगुती उद्योग मिळाल्यास त्यांची रोजगाराची समस्या कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. तसेच महिला स्वावलंबी होऊन सक्षमीकरणाचा उद्देश साध्य होईल, या दृष्टीकोनातून ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पवार हे स्वयं रोजगार निर्मितीसाठी स्वतः त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ही योजना राबवणार असून या विषयीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन हे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थतर्फे करण्यात येणार आहे.

निराधारा महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न

घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने अशा कुटुंबावर आलेलं संकटं मी समजू शकतो. याच जाणिवेतून कुटुंबातील निराधार महिलांच्या हाताला काम मिळून त्यांचा रोजगाराचा प्रश्न दूर व्हावा याकरिता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत निराधार महिलांकरिता ‘आधार’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या महिलांना स्वावलंबी करून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी रोजगार सहाय्य करण्यात येणार आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

म्युकर मायकोसिसबाबत समुपदेशन

तसेच कर्जत-जामखेडमधील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत ‘काळी बुरशी’ म्युकर मायकोसिस बाबत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे 6 जून रोजी कर्जत येथे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. (rohit pawar measures to support families who lost earning member to Covid)

संबंधित बातम्या:

Corona Second Wave | 21 मे ते 31 मे, दहा दिवसात नव्या कोरोना रुग्णांमध्ये एक लाखांहून अधिक घट, पाहा संपूर्ण आकडेवारी

चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली: संजय राऊत

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

(rohit pawar measures to support families who lost earning member to Covid)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.