Rohit Pawar : आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा, रोहित पवरांचा खोचक सल्ला
सांगली पोलीस स्टेशनमध्ये किती केसेस आहेत ते बघा, त्यांना अराजकीय कार्यक्रम घेता आला असता मात्र त्यांनी फक्त राजकारण केलं. घरातला शेंबडा पोरगा असेल तर मोठी माणसं सांगतात तसं यांना मोठ्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असा खोचक टोला आज पडळकरांना रोहित पवारांनी लगावला आहे.
पुणे : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं राजकीय युद्द गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र पाहातोय. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला (Ahilyadevi Holkar) परळीत झालेला राजकीय ड्रामा हाही आपण पाहिला आहे. हा वाद अजून संपला नव्हता. तोपर्यंत आज रोहित पवार यांनी पुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.भाजपच्या मोठ्या नेत्यांनी यांना आवरलं पाहिजेय. आपण काय आहोत मोठ्या नेत्यांवर बोलताना याचा विचार केला पाहिजे यांच कर्तुत्व काय ? सांगली पोलीस स्टेशनमध्ये किती केसेस आहेत ते बघा, त्यांना अराजकीय कार्यक्रम घेता आला असता मात्र त्यांनी फक्त राजकारण केलं. घरातला शेंबडा पोरगा असेल तर मोठी माणसं सांगतात तसं यांना मोठ्या नेत्यांनी सांगितले पाहिजे, असा खोचक टोला आज पडळकरांना रोहित पवारांनी लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
रोहित पवार-पडळकर यांच्यात नेमका वाद का पेटला?
पवारांचा राजकारण हे नेहमीच पडळकरांच्या टार्गेटवर असतं. ना रोहित पवार पडळकरांवर टीका करण्याची संधी सोडतात. ना पडळकर रोहित पवारांवर टीका करण्याची संधी सोडतात. मात्र आता गेल्या काही दिवसांपूर्वीच चौडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पार पडली. या जयंतीनित्ताने रोहित पवार यांनी यंदा पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केला होता. त्यातच जयंती साजरी करण्यासाठी सालाबादप्रमाणे गोपीचंद पडळकर हे चौंडीत निघाले. मात्र नेमकं यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सुरू झाला राजकीय राडा आणि वाद… राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका ही भाजपकडून होऊ लागली. तर पडळकर हे केवळ राजकारण करत आहेत, गोंधळ निर्माण करत आहेत, अशी टीका ही महाविकास आघाडीकडून होऊ लागली. तेव्हापासून हा वाद सुरूच आहे.
आम्ही कार्यक्रमक करतोच
त्यावरच बोलतना रोहित पवारांनी आज भाजप नेते प्रवीण दरेकरांनाही इशारा दिला आहे. तुम्ही पवारांचा नाद करू नका आमचं सगळं ठरलेलं असतं टप्प्यात असल्याशिवाय आम्ही कार्यक्रम करतचं नाही, असे म्हणत प्रवीण दरेकरांना खुलं आव्हान रोहित पवारांनी दिलं आहे. तर प्रवीण दरेकर मोठे नेते आहेत ते लोकांमध्ये जात नसतील मी लोकांची भावना बोलून दाखवली, अशी प्रतिक्रिया यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे. तर रोहित पवारांना यंदाच अहिल्यादेवी होळकर आठवल्या का? रोहित पवारांच्या सरकारमधील मंत्र्यांनी दाऊच्या बहिणीशी व्यवहार केले, तोच पैसा चौंडीत वापरता का? रोहित पवार लग्नाची पत्रिका घेऊन फिरताहेत का? असे असे अनेक सवाल करत पडळकरांनीही या कार्यक्रमाआधी हल्लाबोल चढवला होता.