Pune Sachin Kharat : सगळ्यांचा डीएनए एकच मग स्वत:ला आदिवासी, दलित घोषित करा; सचिन खरात यांचं पुण्यात फडणवीसांना आव्हान

देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सगळ्यांचा डीएनए एकच सांगत असाल, तर स्वतःला आदिवासी आणि दलित म्हणून जाहीर करा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

Pune Sachin Kharat : सगळ्यांचा डीएनए एकच मग स्वत:ला आदिवासी, दलित घोषित करा; सचिन खरात यांचं पुण्यात फडणवीसांना आव्हान
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सचिन खरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:37 AM

पुणे : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खैबरखिंडीतून आर्य आले, हे लिहिणारे तुमचेच लोक खोटारडे आहेत, हे जाहीर करा. फडणवीसजी तुम्ही सगळ्यांचा डीएनए एकच सांगत असाल, तर स्वतःला आदिवासी आणि दलित म्हणून जाहीर करा, असे आव्हान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे. भारतातला सगळ्यात प्रीव्हीटीव्ह ट्रायब म्हणून जे अंदमानचे आदिवासी आहेत, ते असतील, बंगालमध्ये राहणारे ब्राम्हण असतील, साऊथमध्ये राहणारे नायर असतील किंवा उत्तर प्रदेशात राहणारे ज्यांना आपण दलीत समाजाचे म्हटले आहे, ते असतील. या सगळ्यांचा डीएनए (DNA) एकच निघाला. हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, असे वक्तव्य भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यावर सचिन खरात यांनी टीका केली आहे. सर्वांचा डीएनए एकच असेल तर फडणवीसांनी स्वत:ला दलित घोषित करावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

‘ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा खोटा प्रयत्न’

खरात म्हणाले, की नवीन डीएनएचा शोध लावणारे वैज्ञानिक देवेंद्र फडणवीसजी हे आदिवासी, दलित, नायर आणि ब्राह्मण हे एकाच डीएनएचे आहेत असे सांगून ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत. मग एकाच जातीच्या लोकांना शिक्षण अधिकार होता. त्याच जातीच्या लोकांनी आर्य खैबरखिंडीतून आले हा इतिहास पुराव्यानिशी मांडला. ते सर्व खोटारडे होते हे जाहीर करा.

काय म्हणाले होते फडणवीस?

पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठानतर्फे दीपस्तंभ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे वक्तव्य करत आर्य आणि द्रविड संघर्षावर सडकून टीका केली होती. तसेच ही थेअरीच पूर्ण चुकीची असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे म्हणत हे सर्व एका बापाची औलाद असल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा :

Pune crime : पैसे देऊन मिळतंय दिव्यांग प्रमाणपत्र! पुण्यातल्या ससून रुग्णालयात होतोय काळाबाजार

Pune ST : लालपरी पुन्हा सुसाट..! प्रवाशांना सेवा देताना आनंद होत असल्याचे म्हणत पुण्याच्या स्वारगेट डेपोतले कर्मचारी परतले कामावर!

Pune garbage : राष्ट्रीय महामार्ग की ‘कचरा’मार्ग? पुण्यातल्या ‘या’ ठिकाणी साठणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतुकीस होतोय अडथळा

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.