RTE Admission| 30 सप्टेंबरपर्यंतच ‘आरटीई’ प्रवेश; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा काय आहे निर्णय?

आरटीईची 25  टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

RTE Admission|  30 सप्टेंबरपर्यंतच 'आरटीई' प्रवेश; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा काय आहे निर्णय?
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 1:19 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ सुरु राहिल्याने विद्यार्थ्याने नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक व उपस्थितीचे नुकसान टाळण्यासाठी यंदा येत्या 30 सप्टेंबरपर्यंतच आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा(Admission under RTE) राबवण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने (Directorate of Elementary Education)घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2022 -23 मध्ये होणारी आरटीईअंतर्गत प्रवेश परीक्षा 30  सप्टेंबरपर्यंतच संपवण्यास सांगण्यात आले आहे. याबरोबरच सप्टेंबरनंतरही जागा रिक्त राहिल्या तरी प्रवेशाची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर (Director of Primary Education Dinkar Temkar)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी असेल प्रक्रिया येत्या 2022-23 च्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या 25  टक्के राखीव जागांसाठी एकदाच सोडत एकदाच सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर या सोडतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा लघुसंदेश पाठवला जाईल. पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

 संस्थांवर होणार कारवाई चालू वर्षापासून शाळांची नवीन नोंदणी करताना नव्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांत तीन वर्षांपर्यंत आरटीईचे प्रवेश देऊ नयेत. संबंधित शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून निर्णय घ्यावा. आरटीईची 25  टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांच्या नोंदणीची शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. ज्या शाळा पात्र असूनही नोंदणी न करणाऱ्या किंवा 25 टक्के जागा उपलब्ध करून न देणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांत आरटीई प्रवेश प्रक्रियेशी संबंधित काही अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित झाल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. मात्र शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत शाळांची नोंदणी पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Khan Sir : RRB NTPC निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं हिसंक आंदोलन, खान सरांवर एफआयर दाखल, नेमकं कारण काय?

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाची सरकारसह वीज कंपनीला नोटीस, काय आहे प्रकरण?

Royal Enfield Scram 411 लाँचची तारीख पुढे ढकलली, जाणून घ्या कधी सादर होणार बहुप्रतीक्षित बाईक?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.