AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : ईडी कारवाई कोणावर होते अन् कोणावर नाही, हे महाराष्ट्र पाहतोय; ईडीच्या कार्यपद्धतीवर रुपाली चाकणकरांचा सवाल

ईडी कारवाईत काही निष्पन्न होत नाही, हा मुख्य विषय आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवाईतून काय समोर आले. असा सवाल करत यामुळे कुटुंबीयांवर परिणाम होतो, अशी खंत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

Rupali Chakankar : ईडी कारवाई कोणावर होते अन् कोणावर नाही, हे महाराष्ट्र पाहतोय; ईडीच्या कार्यपद्धतीवर रुपाली चाकणकरांचा सवाल
राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 3:50 PM

पुणे : ईडी (ED action) कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाही, हे सगळा महाराष्ट्र पाहत आहे, अशी सूचक टिप्पणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावर रुपाली चाकणकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राकडून ईडीचा गैरवापर होत आहे. विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. दुसरीकडे भाजपातील () एकाही नेत्यावर ईडीकडून कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राजकारणात BJPअनेक वेळा आरोप केले जातात. गाडीभर पुरावे आणि गाडी कोणीच पोहोचले नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘ईडीमार्फत काय निष्पन्न झाले?’

ईडी कारवाईत काही निष्पन्न होत नाही, हा मुख्य विषय आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवाईतून काय समोर आले. असा सवाल करत यामुळे कुटुंबीयांवर परिणाम होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जाणीवपूर्वक विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘अशी वक्तव्ये टाळावी’

राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करणे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी टाळावे. महाराष्ट्र एकसंघ आहे. महामहिम राज्यपाल अशी वक्तव्ये करून काय साध्य करत आहेत, ते कळत नाही, असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘गुन्हा दाखल झाला आहे’

संजय राऊत यांच्या ऑडिओ क्लिपमधील महिलेबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार अद्याप आलेली नाही. पण गुन्हा दाखल झाला आहे. त्याची माहिती घेत आहोत. राज्य महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

‘क्लिप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई नाही’

जोपर्यंत ऑडिओ व्हिडिओ क्लिप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करता येत नाही. राहुल शेवाळे प्रकरणात कारवाई करणार आहोत. उद्या शेवटचा दिवस आहे. चार महिने झाले आहेत. पण आता उद्या एक ऑगस्टला तक्रार देऊन अहवाल देणार आहे. काय होते, ते पाहावे लागेल, असे चाकणकर म्हणाल्या.

भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.