कोल्हापूर: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांची माहिती व्हावी म्हणून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘किसान आत्मनिर्भर यात्रा‘ सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 24 डिसेंबरपासून ही आत्मनिर्भर यात्रा सुरू होणार असून त्याचं सारथ्य मात्र भाजप नेते करणार आहेत. त्यामुळे खोतांची ही यात्रा भाजपच्या इशाऱ्याने सुरू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. (sadabhau khot announced kisan aatm nirbhar yatra in maharashtra for supporting farm law)
सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. येत्या 24 डिसेंबरपासून ही यात्रा सुरू होणार असून 27 डिसेंबर रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून ही यात्रा सुरू होणार असून या यात्रेची सांगता इस्लामपूर येथे एका जाहीर सभेने होणार आहे. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
चार टप्प्यात यात्रा, या ठिकाणी सभा
एकूण तीन दिवस ही यात्रा सुरू राहणार असून चार टप्प्यात ही यात्रा पार पडेल. पहिल्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांची यात्रा असणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ असे संपूर्ण राज्यात ही यात्रा पुढील टप्प्यात असणार आहेत. यावेळी शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगाव आणि इस्लामपूर येथे सभा घेण्यात येणार आहे. या सभांना भाजप आणि भाजप युतीतील मित्र पक्षांना बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप नेते सारथी?
दरम्यान, खोत यांच्या या यात्रेवर टीका होऊ लागली आहे. या यात्रेची सुरुवात भाजप नेते आशिष शेलार यांच्या हस्ते आणि सांगता चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. भाजप नेतेच या यात्रेचे अप्रत्यक्षपणे सारथी झाल्याने त्यावर टीका होत आहे.
दिल्लीतील आंदोलन दलालांचं
यावेळी खोत यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केली. दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांचं नाहीच. हे आंदोलन दलालांचं आहे. राजकीय स्वार्थासाठी काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवण्याचा यामागे खटाटोप आहे, अशी टीका खोत यांनी केली. (sadabhau khot announced kisan aatm nirbhar yatra in maharashtra for supporting farm law)
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 21 December 2020https://t.co/di6KMwNavA
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
संबंधित बातम्या:
शरद पवारांवर विश्वास, मुख्यमंत्र्यांना ते समजावतील : प्रवीण दरेकर
बिनविरोध ग्रामपंचायत, राजकारणाचा नवा भूलभुलय्या?
चंद्रकांत पाटलांचं आवाहन उद्धव ठाकरे स्वीकारतील? फडणवीसांना घेऊन मोदींना भेटतील?
(sadabhau khot announced kisan aatm nirbhar yatra in maharashtra for supporting farm law)