Rupali Patil: जी अवस्था केतकी चितळेंची झाली, तीच अवस्था सदाभाऊ खोतची झाली पाहिजे.. कळेल की किती वेदना होतात- रुपाली पाटील
जी अवस्था केतकी चितळेंची झाली तीच अवस्था सदाभाऊ खोत याचे झाली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की किती वेदना होतात. ते जे म्हणत आहेत की केतकीवर आलेल्या कमेंट बघा, अरे तुम्हीच जरा विकृती पसरवत आहात तर तुम्ही लोकांच्याकडून चांगलायची अपेक्षा कशी करू शकता, असे सवाल रुपाली पाटील यांनी विचारला आहे.
पुणे – शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)यांनी अभिनेत्री केतकी चितळेंला समर्थन दिले आहे. तिचा अभिमान आहे असे त्यांनी म्हटलं आहे. मानलं पाहिजे त्या मुलीला तिने न्यायालयात स्वतःची बाजू मांडली,स्वतःवर टीका झाली की सगळं आठवत असे म्हणत सदाभाऊ खोतांनी सरकारला टोला लगावला आहे. प्रस्थापितांच्या हा वाडा आम्हाला पाडायचा आहे.असे वक्तव्य सदाभाऊ यांनी केलं आहे. त्याच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil)यांनी आक्षेप घेत टीका केली आहे. जी अवस्था केतकी चितळेंची (ketaki chitale)झाली तीच अवस्था सदाभाऊ खोत याचे झाली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की किती वेदना होतात. ते जे म्हणत आहेत की केतकीवर आलेल्या कमेंट बघा, अरे तुम्हीच जरा विकृती पसरवत आहात तर तुम्ही लोकांच्याकडून चांगल्याची अपेक्षा कशी करू शकता, असे सवाल रुपाली पाटील यांनी विचारला आहे.
विकासाचं बोलायचं नाही.
राज्य कसा आतंकवाद आहे. सदाभाऊ स्वताच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरन विचारा अमृता फडणवीस याच्या गाण्यावर जे बोललेलं जात त्यावर काय कमेंट येतात लोकांच्या की आम्हाला त्रास होतो, तेव्हा राष्ट्रवादीने स्वतः पुढाकार घेत एफआयआर दाखल केला. मुळात सोशल मीडियावर अशी विकृती आणणारे सदाभाऊ खोत व भाजप आहे अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. यांना विकासाचं बोलायचं नाही. मावळ प्रकरणात पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. सदाभाऊंना केतकीचे समर्थन करू वाटतंय तर तिचा घरी नेऊन सत्कार करा. कृपया महाराष्ट्र अस्थिर करू नका. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणारे तुम्ही आम्हाला संस्कार शिकवताय का ? असा खोचक सवालही पाटील यांनी केला आहे.
सरकारन हा धंदा थांबवा
राज्यातील अनेकप्रश्न आवासून उभे आहेत. तुमच्यावर एखादी गोष्ट आली की साजूक पनाचा आव आणायचा. ब्राह्मण समाजाला वेठीला धरून किती वर्ष राजकारण करणार आहात तुम्ही. ब्राह्मण समाजाला कुठं वेळा आहे आरत्या म्हणायाला , त्यांची पोरं शिकली, परदेशात गेली. ती कुठं मोकळी आहेत आरत्या म्हणायलात्यामुळे सरकारन हा धंदा थांबवा , गावगाड्यातला माणूस मरायला लागला आहे. त्याला पिण्याचे पाणी द्या. विम्याचे पैसे द्या, कर्जमाफी करा.असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. आरत्या म्हणा आम्हीही म्हणतो पण स्वतःच्या, घरात दुसऱ्याच्या घरात जाऊन टिमक्या वाजत नाही असे उत्तर रुपाली पाटील यांनी दिले आहे.