Pimpri Chinchwad : टाटा मोटर्सच्या कामगारांना वेतनवाढ; एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे नाराजी? वाचा सविस्तर

या करारानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपये वाढ मिळणार आहे. या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे (Tata Motors) वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad : टाटा मोटर्सच्या कामगारांना वेतनवाढ; एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे नाराजी? वाचा सविस्तर
वेतनवाढ झाल्यानंतर जल्लोष करताना टाटा मोटर्सचे कर्मचारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:14 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या टाटा मोटर्समध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात नुकताच 2022 ते 2026 या चार वर्षे कालावधीसाठी दीर्घकालीन वेतन करार झाला आहे. त्यानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. या कारारानंतर कामगारांनी कंपनीमध्ये जोरदार जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे काही कामगारांनी मात्र तीन ऐवजी चार वर्षांचा करार करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) आणि ईदच्या पार्श्वभूमीवर ही वेतनवाढ झाली आहे. या करारानुसार कामगारांना 16 हजार 800 रुपये वाढ मिळणार आहे. या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे (Tata Motors) वरिष्ठ अधिकारी, युनियन पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते. उत्पादनक्षमतेचे मापन म्हणून ‘एचपीईव्ही’ या जागतिक परिमाणावर, गुणवत्तेचे मापन – डीआरआर आणि सक्रिय सुरक्षा मापदंड याच्यावर आधारित ”व्हेरिएबल पे” योजना जाहीर करण्यात आली.

‘करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन’

ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष ए. बी. लाल म्हणाले, की मी व्यवस्थापन आणि युनियन या दोन्ही कमिटीचे दीर्घकालीन वेतनविषयक करार वेळेवर आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो. या करारामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मी पुणे प्लांटला सर्वतोपरी यश चिंततो आणि अनेक वर्षांपासून निर्माण झालेले परस्पर सहकार्य आणि विश्वासाचे संबंध दृढ करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो.

‘हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी’

युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे म्हणाले, की हा वेतनविषयक करार सर्वांसाठी आशादायी आहे. युनियन आणि कामगार खूप आनंदी आहेत. टाटा मोटर्सचे नेतृत्वाचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी दोघेही कठोर परिश्रमाचे योगदान सतत सुरू ठेवतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.