संभाजी भिडे यांच्या ‘या’ व्हिडीओची का होतेय एवढी चर्चा? पाहा नेमकं काय म्हणाले

तिरंगा, स्वातंत्र्यदिन याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यानंतर संभाजी भिडेंनी आता लव्हजिहादवरुन चिथावणी दिलीय. हाती कोयते घेऊन खापलून काढा, असं ते समोर बसलेल्या लोकांना सांगतायत.

संभाजी भिडे यांच्या 'या' व्हिडीओची का होतेय एवढी चर्चा? पाहा नेमकं काय म्हणाले
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 10:01 PM

पुणे : तिरंगा, स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीताला विरोध केल्यानंतर आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे लव्ह जिहादविरोधात कायदा हातात घेण्याची भाषा करतायत. जाहीर कार्यक्रमात कोयते हातात घ्या. लवकरच ते काम आपण करु, अशी चिथावणी संभाजी भिडे यांनी दिली आहे. “जेव्हा ध्वज म्हणून तिरंगा भारतानं स्वीकारला तेव्हा भगव्याला मानणारे सावरकर आणि संघ हे दोघंही काहीच बोलले नाहीत”, असंही संभाजी भिडेंनी म्हटलंय. काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडनं संभाजी भिडेंविरोधात आंदोलन करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. जाहीरपणे देशविरोधी विधानं करुनही सरकार गप्प का? असा प्रश्न विरोधक करत आहेत. याच कार्यक्रमात संभाजी भिडेंनी तिरंगा, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल वक्तव्य केली.

एकीकडे पुण्यासारख्या शहरात तरुणांनी कोयते हातात घेऊन कायदा हाती घेतलाय आणि दुसरीकडे संभाजी भिडे लव्ह जिहादविरोधात तरुणांना कायदा हाती घेण्यासाठी चिथावणी देतायत. यावर सरकार कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

संभाजी भिडे लव्ह जिहादबद्दल काय म्हणाले?

“लव्ह जिहाद! हम्म… काय घडतंय हे? जी XXX म्हणून जन्मभर या देशाची शत्रू जन्माला घालायला तयार आहे ती हिंदू समाजाची XXX तिला खपवून टाकलं पाहिजे. आणि XX खाणारा तो XXX त्यालाही कोयत्यानं खापलला पाहिजे. असं बोलणारा गाढव तुम्हाला मी पहिला भेटलो असेल. हो… आपण हे करणार आहोत. आपण हे महाराष्ट्रात करणार आहोत. शंभर टक्के करणार आहोत”, असं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

संभाजी भिडे स्वातंत्र्याबद्दल काय म्हणाले?

“स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्व… हिंदुत्व… प्रखर मनुष्य! पण त्यांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला नाही. याह.. जमत नाही, कुठून काढलं स्वातंत्र्य? पेटवून द्या स्वातंत्र्य, भगवाच झेंडा पाहिजे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, भगवा झेंडा हाच राष्ट्रीयत्व, असं म्हणणारे संघ होता. पण तेही काही बोलले नाहीत”, असं संभाजी भिडे म्हणाले.

“काय लायकीचे देश? काय लायकीचे लोक? काय लायकीचे स्वातंत्र्य? आणि काय झेंडावंदन? कसं का असेना? XXX स्वातंत्र्य असेना, तरी ते पत्करलं पाहिजे”, असंही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं.

संभाजी भिडे साईबाबा यांच्याबद्दल काय म्हणाले?

“सगळे XXX तसेच असतात. आपण सगळे नाहीत का XXX हिंदू याचा अर्थच XXX. माझ्यावर रागू नका. आपण साईबाबाला मानतो. आपण गांधीबाबाला मानतो आणि सुशिक्षित मनुष्य सुपर XXX असतो”, असं संभाजी भिडे म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.