कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati to meet cm uddhav thackeray over maratha reservation)
संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं. त्याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल याची अपेक्षा आहे. मात्र, चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही, असा सूचक इशारा संभाजीराजेंनी दिला.
मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होत आहे. पण आज ऐवजी उद्या भेट व्हावी अशी समन्वयकांची भूमिका होती. पण मुख्यमंत्र्यांचा आजच बैठक घेण्यासाठी आग्रह होता. त्यामुळे आज संध्याकाळी ही बैठक होत आहे. भेटी आधी समन्वयकांशी कोणतीही बैठक होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत असली तरी आरक्षणासाठीचा लढा कायम राहणार आहे. हा लढा सुरू असतानाच राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत. त्या मार्गी लावाव्यात, असं सांगातनाच केंद्र सरकारवर माझे प्रयत्न आधीपासून सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने दिल्लीत अनेकांना पत्रं दिलि आहेत. समाजाचं हित होणार असेल तर घटना दुरुस्तीही केली जाऊ शकते, असंही ते म्हणाले.
राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे, असं सांगतानाच सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असं संभाजीराजे यांनी कालच स्पष्ट केलं होतं. तर, “मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, अशी मागणी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती. (sambhaji chhatrapati to meet cm uddhav thackeray over maratha reservation)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 June 2021https://t.co/01P77NuPay
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या:
Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचीच निवड का?; वाचा सविस्तर
सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हसन मुश्रीफांची गर्जना, आघाडी सरकारची ‘ती’ चूकही मान्य!
हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
(sambhaji chhatrapati to meet cm uddhav thackeray over maratha reservation)