Shivrajyabhishek: रायगडावर सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा, संभाजी छत्रपती मौन सोडणार?

Shivrajyabhishek: राज्यसभेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच संभाजी छत्रपती रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ते रायगडाच्या पायथ्यावर आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्याचे संकेत आहेत.

Shivrajyabhishek: रायगडावर सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा, संभाजी छत्रपती मौन सोडणार?
रायगडावर सोमवारी शिवराज्याभिषेक सोहळा, संभाजी छत्रपती मौन सोडणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 1:49 PM

पुणे: रायगडावर येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक (shivrajyabhishek) सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अत्यंत देखणा आणि दिमाखदार करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीनं जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी यंदा रायगडावर (raigad fort) जमणार आहेत. या सोहळ्यासाठी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपतीही (sambhaji chhatrapati) उपस्थित राहणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संभाजी छत्रपती यांना तिकीट मिळालं नव्हतं. त्यावरून राजकीय नाट्यही घडलं होतं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती रायगडाच्या पायथ्याला नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किल्ल्यावर ते कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाहीत. पण रायगडाच्या पायथ्याला ते राजकीय भूमिका मांडू शकतात. त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने संभाजी छत्रपती 6 जून रोजी मौन सोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यसभेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच संभाजी छत्रपती रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ते रायगडाच्या पायथ्यावर आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्याचे संकेत आहेत. यावेळी ते स्वराज्य पक्षाच्या वाढीच्या अनुषंगाने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा उभारण्याबाबतही त्यांच्याकडून काही घोषणा केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राऊत-श्रीमंत शाहू महाराजांच्या भेटीवर बोलणार?

गेल्या आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत हे कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यावरही संभाजी छत्रपती काही भाष्य करणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तसेच राज्यसभेच्या तिकीटावरून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या विधानाचाही ते समाचार घेणार का? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हे सुद्धा वाचा

एकच धून, 6 जून

दरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्ताने एक प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. ऐका…! एकच धून… 6 जून… चलो रायगड, असं टायटल देऊन हा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 54 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक जीन्स घातलेला तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा दिसत आहे. हा तरुण सेल्फी काढताना दिसत आहे. ते पाहून मावळा त्याला उठाबशा काढायला लावतो. त्यानंतर हा तरुण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन वर जाण्याचा बेत आखताना दिसत आहे. तिथेही मावळा येतो आणि त्याला उठाबशा काढायला सांगतो. एकही संवाद नसलेल्या या व्हिडीओत बॅकग्राऊंडला ढोलताशा वाजवण्यात आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.