खासदार संभाजी छत्रपती सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजी छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue)

खासदार संभाजी छत्रपती सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:08 PM

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजी छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंरब रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue)

राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपतींपुढे भावना मांडणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती व केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. सोबत महाराष्ट्रातील खासदारांना देखील समवेत भेटीसाठी वेळ दिली जावे असे कळविले होते. आज त्यांनी प्रमुख राजकीय पक्ष, अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय गटनेते यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे येत्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

50 टक्क्यांची मर्यादा हटवणे आवश्यक

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना मांडणार आहे. यावेळी राज्यपाल काय सल्ला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जाणून घ्या, महाराष्ट्रात आरक्षणाचा टक्का

62% OBC 19% SC 13% ST 7% EWS 10% SBC 2% NT(A) विमुक्त 3% NT(B) बंजारा 2.5% NT(C) धनगर 3.5% NT(D) वंजारी 2 %  (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue)

संबंधित बातम्या:

जे संभाजी छत्रपतींच्या पोटात तेच ओठावर आलंय का? मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा समजून घ्या 10 पॉईंट्समधून

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

(sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.