Sambhajiraje chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींनी राजकीय पक्ष काढावा, मराठा समाजाच्या प्रश्नांवरून पुण्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje chhatrapati) यांनी राजकीय पक्ष काढावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून संभाजीराजेंकडे केली आहे. आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करत आहोत. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे हा एक पर्याय आहेत. त्यांनी उद्या पक्षाची घोषणा करावी, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते आपली पुढची […]

Sambhajiraje chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींनी राजकीय पक्ष काढावा, मराठा समाजाच्या प्रश्नांवरून पुण्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी
राजकीय पक्ष काढण्याची संभाजीराजेंना विनंती करताना कार्यकर्तेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:49 PM

पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje chhatrapati) यांनी राजकीय पक्ष काढावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून संभाजीराजेंकडे केली आहे. आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करत आहोत. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे हा एक पर्याय आहेत. त्यांनी उद्या पक्षाची घोषणा करावी, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत. मराठा समाजाच्या (Maratha community) विविध प्रश्नांवरून सध्या संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न सोडवतो, असे सरकार म्हणत आहे. मात्र करत काही नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. त्या पार्श्वभूमीवर उद्या ते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना नवा राजकीय पक्ष (Political party) काढण्याची मागणी केली आहे.

सर्वसमान्यांच्या प्रश्नांकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष

संभाजीराजेंनी त्यांची खासदारकी संपल्यानंतर काय करावे, असा पोल टीव्ही नाइनने केला होता. त्यात बहुतेकांनी पर्याय सुचवला आहे, की स्वत:चा राजकीय पक्ष काढावा आणि एक पर्याय उपलब्ध करून द्यावा. राज्यात सध्या विविध समस्या आहेत. त्यात रोजगार, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे असे अनेक प्रश्न आहेत. याकडे कुणीही लक्ष देत नाही. तरुणांना रोजगार मिळायला हवा. मात्र हे बाजूला ठेवून अनेकजण जातीय दंगली, भोंगे असे विषय पुढे आणून राजकारण करीत आहेत. त्यामुळे समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी संभाजीराजेंनीच पुढाकार घ्यावा, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सामान्यांच्या संभाजीराजेंकडून अपेक्षा

सर्वसामान्य जनतेला संभाजीराजेंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आम्ही सोशल मीडियावरही पाहतो, की अनेकांना संभाजीराजेंनी नवा पक्ष काढावा आणि राज्यातील प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा आहे. कारण इतर राजकारणी, सरकार केवळ तारखा देत असून समाजाचे प्रश्न सोडवताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सर्वचजण संभाजीराजेंनी नवा पक्ष काढावा, अशी मागणी करतो, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले कार्यकर्ते, पदाधिकारी?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.