सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी मागितले, सकारात्मक चर्चा सुरु, अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर संभाजीराजे यांची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात पुणे येथे बैठक पार पडली.
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात बैठक पार पडली. संभाजीराजे छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीवेळी मराठा क्रांती मोर्चाचे काही समन्वयक हजर होते. संभाजीराजे यांनी बैठकी काय घडलं याविषयी माहिती दिली. सारथीसंदर्भात बैठक पार पडली असून 1 हजार कोटी मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. (Sambhajiraje Chhatrapati said we demanded 1 thousand crore for Sarathi during meeting with Ajit Pawar)
सारथी संदर्भात 13 मागण्या करण्यात आल्या
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणेला स्वायत्तता देण्यात आली असून 13 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सारथी संस्थेची 8 विभागीय कार्यालय होणार आहेत. पहिले कार्यालय कोल्हापूरला सुरु होणार आहे. 1 हजार कोटी आणि इतर मागण्यांसाठी 21 दिवसांचा वेळ लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
समाजासाठी सारथी हवं आहे
समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना सारथीवर घेतो, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. संभाजीराजेंना सारथीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. ही संस्था समाजासाठी मजबूत व्हायला हवी आहे, असंही ते म्हणाले. सारथीच्या माध्यमातून वसतिगृह सुरु होणार आहेत. 9 ते 10 वसतिगृह होणार सुरु करण्याबाबत युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे.
तारादूत प्रकल्पाचं काय?
तारदूत प्रकल्प सुरू होणार आहे, त्याबाबत काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर होतील, असंही सांगण्यात आलं, असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं.
अजित पवार शाहू महाराज यांना भेटले आहेत त्याची मला कल्पना नाही. ते आशीर्वाद घ्यायला गेले असतील. सारथी चर्चा सुरुवात चांगली झाली चर्चा झाली हे महत्वाच आहे. मूक आंदोलन मागे घेतलं नाही, 30 तारखेला त्याबाबत निर्णय ठरेल. पीएचडी फेलोशिपबाबत चर्चा झाली. काही कायदेशीर बाबी आहेत त्यानुसार जावे लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
VIDEO : कोरोना व्हायरसची यांच्याशी चर्चा, गर्दी केली तरी मी हल्ला करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांची मिश्किल टीकाhttps://t.co/0AnOMQz7lk@SMungantiwar #BJP #NCP #Pune #AjitPawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 19, 2021
संबंधित बातम्या:
Sambhaji Raje | सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली, सरकारपुढे 6 मागण्या ठेवल्या : संभाजीराजे
(Sambhajiraje Chhatrapati said we demanded 1 thousand crore for Sarathi during meeting with Ajit Pawar)