मावळला देतात तोच न्याय बारामती आणि शिरुरला द्यावा – सुप्रिया सुळे

पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित होते. या बैठकीत बरीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांनी म्हटलं की, या बैठकीत प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार नसतो. जे समितीची सदस्य असतात त्यांनाच बोलता येतं.

मावळला देतात तोच न्याय बारामती आणि शिरुरला द्यावा - सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 5:17 PM

पुण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. त्यांनी सगळ्यांना समान निधी वाटप करावा अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमध्ये पालकमंत्र्यांच्या शेजारी खासदार बसले होते. रायगडला पालकमंत्री बोलवून घेतात मग कामे समजून घेतात. निधीचे नियोजन करुन निर्णय घेतात. नेहमी डीपीडीसीचा अनुभव चांगलाच राहिला आहे. आम्ही श्रीरंग बारणे यांचं ही मार्गदर्शन घेतलं. कारण आमच्याकडे काही कमतरता असेल. श्रीरंग बारणे यांना जास्त झुकतं माप दिलं जातं. म्हणून आणखी निधी मतदारसंघात कसा आणता येईल याचं मार्गदर्शन करा असं म्हटलं.’

‘सुनील शेळके यांनी माझं नीट ऐकून घेतलं नाही. मी म्हटले की, मावळला दिलं याबद्दल आभार आहे. कारण मावळ महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा भाग आहे. पण जो न्याय मावळला देतात तोच बारामती आणि शिरुरला द्यावा हीच अपेक्षा होती. त्यावर ते नाराज झाले. ते म्हणाले याआधी बारामतीला खूप दिलं आहे तेव्हा आम्ही काही बोललो नाही. त्यावर मला बोलणं महत्त्वाचं वाटत नाही. त्यांनी पालकमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित करावा.’

‘मी माझं राजकारण आहे वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवले आहेत माझे सर्व पक्षांमध्ये चांगले संबंध आहेत. माझी लढाई वैचारिक आहे. वळसे पाटील यांना अनेकदा भेटते. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत ही जुने संबंध आहेत. पालकमंत्री म्हणतात ते योग्य असेल मग. डीपीडीसीबाबत असं आहे का याची मी पण माहिती घेणार आहे. यात जर असा नियम असेल तर मग आम्ही खासदारांनी कशाला येऊन वेळ वाया घालवावा.’

मावळला अधिकचा निधी मिळाला असं सुप्रिया सुळे म्हणत होत्या. म्हणून आम्ही आक्षेप घेतला. मागील २०-२५ वर्षामध्ये बारामती अधिक निधी मिळाला तेव्हा मावळने कधी काहीही म्हटले नाही. असं सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.