Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलीवूड चित्रपटाच्या स्टाईलने व्यापाऱ्याकडून एक कोटीची लूट

बॉलीवूडमधील चित्रपटाप्रमाणे लुटीचा थरार सांगलीत घडला. सात ते आठ जणांनी रस्त्यावर संधी साधून व्यापाऱ्याची गाडी आडवली. गाडीत बसलेल्या सर्वांना मारहाण केली. अन् काही समजण्यापूर्वी गाडीतील कोट्यवधी रुपयांची बॅग घेऊन पसार झाले.

बॉलीवूड चित्रपटाच्या स्टाईलने व्यापाऱ्याकडून एक कोटीची लूट
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:36 PM

सांगली : एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी लूट करण्याचा प्रकार घडला आहे. ज्या प्रमाणे चित्रपटात चोरटे एखाद्या उद्योजकाचा किंवा व्यापाऱ्याचा पाठलाग करतात. त्यानंतर रस्त्यावर संधी साधून त्यांची गाडी आडवतात. अन् काही समजण्यापूर्वी गाडीतील कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते. या पद्धतीचा प्रकार सांगली जिल्ह्यात घडला. या ठिकाणी एका द्राक्ष व्यापाऱ्यास लुटण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सांगली पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी चार पथके तपासाठी रवाना केले आहेत.

नेमके काय घडले

तासगावमध्ये एका द्राक्ष व्यापाऱ्यास लुटण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. महेश केवलानी हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव तेथील द्राक्ष व्यापारी आहेत. तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेऊन ते विक्री करतात. मंगळवारी व्यापाऱ्यासाठी ते सांगलीत आले होते. त्यांनी आपल्या स्कॉर्पिओ गाडीत शेतकऱ्यांना देण्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांची रक्कम आणली होती. ते सांगलीवरुन तासगावला निघाले. ते राहत असलेल्या गणेश कॉलनी येथे पोहचले असता अचानक सहा ते सात जण आले. त्यांनी महेश केवलानी यांची स्कार्पिओ गाडी अडवली. गाडीतील लोकांना मारहाण केली. अन् गाडीत असणारी एक कोटी दहा लाख रुपये रकमेची बॅग घेऊन लंपास झाले.

हे सुद्धा वाचा

माहिती असणाऱ्यांकडून लूट

महेश केवलानी,मूळ राहणार पिंपळगाव नाशिक येथील आहेत. ते नेहमी व्यापाऱ्यासाठी येतात. यामुळे त्यांच्यांसंदर्भात माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांगलीचा पोलीस अधीक्षक बसवराज तेली घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी महेश केवलानी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच लुटारूंच्या शोध घेण्यासाठी तीन ते चार पथके तैनात केली आहेत.

पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.