Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, कुठे लागले असे बॅनर

Sangali News : राज्यात बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरतो. राजकीय पक्षांकडून कुरघोडी करणारे बॅनर अनेकवेळा लावले जातात. आता ईडीच्या कारवाईविरोधात लागलेले बॅनरची चर्चा सुरु झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून असे बॅनर लावले आहे.

'भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा', कुठे लागले असे बॅनर
ED banner
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 8:36 AM

शंकर देवकुळे, सांगली : राज्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरु असते. कधी कोणाला भावी आमदार केले जाते, कधी कोणाला भावी खासदार केले जाते. अगदी भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले बॅनरही राज्यात चर्चेचे ठरले होते. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान पुणे शहरात लागलेले आगळेवेगळे बॅनरची चर्चा राज्यभर झाली होती. आता केंद्र सरकारकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी)चा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप करत बॅनर लावले आहे. या बॅनरमध्ये ‘भाजप नेत्यांवर EDची कारवाई दाखवा, 1 लाख रुपये मिळवा’, असे म्हटले आहे.

कुठे लागले बॅनर

सांगत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर लावण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ED ने नोटीस दिली आहे. त्याविरोधात जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जतच्या एसटी स्टँड येथे चक्क डिजिटल बोर्ड लावले आहेत. भाजपच्या नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा, असा मजकूर या बॅनरवर लिहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा “जाहीर निषेध” चा डिजिटल बोर्ड लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात पडताळणीसाठी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात एका व्यक्तीला अनेक कंत्राटं मिळाली होती. त्या व्यक्तीने अनेकांना कमिशन दिल्याचा ईडीला संशय आहे. या संशयाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

कंपनी दिवाळखोरीतjaywant patiljayant patil

आयएल अँड एफएस कंपनीच्या व्यवहारांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जातं. ही कंपनी दिवळखोरीत होती. या कंपनीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचाही संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अरुण कुमार साहा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली होती. याच प्रकरणात आता जयंत पाटील यांना नोटीस बजावली आहे.

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.