संकटांवर संकटे येत आहेत, संघर्ष होत आहेत, पण उद्धव ठाकरे…संजय राऊत यांनी शिवसैनिकांना सांगितले ते रहस्य
sanjay raut in pune: एडीआरचा रिपोर्ट आला. देशातील ५३८ मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मतांमध्ये तफावत आहे. ३६२ मतदारसंघ असे आहेत की त्यात त्यातील आकडे झालेल्या मतदानापेक्षा साडे सहा लाख कमी आहेत. १७६ मतदारसंघ असे आहेत की त्यात दोन लाख मते जास्त मोजली आहे.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जो मंत्र दिला एक तर तू राहिशील किंवा मी राहणार, हाच मंत्र घेऊन आपणास पुढे जायचे आहे. एवढं घडत आहे. संकटावर संकट येत आहे, संघर्ष होत आहे. कोंडी केली जात आहे. पण आमचा नेता हसत संकटाला सामना देत आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देत आहेत. समोर जो जळफळाट सुरू आहे, त्याचं कारण उद्धवजींचं हास्य आहे, असे शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पुण्यात शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा शनिवारी झाला. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.
तर मोद गेलेच होते…
संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्हारे जैसे कुत्ते भोकते रहेंगे, लेकीन हम हटेंगे नही. तू राहशील नाही तर मी राहील हे सांगणारा आमचा नेता उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेत जसे पाहिजे तसे यश मिळालं नाही. दहशत पैसा आणि नवीन पक्ष सर्व काही होते. त्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागला. पण यावेळी आपल्याला अधिक मेहनत करावी लागणार आहे. लोकसभेत अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो. नाही तर मोदी गेलेच होते. मोदी तो गयो म्हटले असते.
लोकसभा निवडणुकीत हेराफेरी
एडीआरचा रिपोर्ट आला. देशातील ५३८ मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मतांमध्ये तफावत आहे. ३६२ मतदारसंघ असे आहेत की त्यात त्यातील आकडे झालेल्या मतदानापेक्षा साडे सहा लाख कमी आहेत. १७६ मतदारसंघ असे आहेत की त्यात दोन लाख मते जास्त मोजली आहे. हा आकडा आपल्याला कमी दिसतो. चार मतदारसंघ आपण अत्यंत कमी मताने हरलो आहोत. ५० पासून ते १२ हजार मतांपर्यंत.
मुंबईची जागा ४८ मतांनी. हातकणंगले ४८ हजार मताने हरलो. उत्तर प्रदेशातील मतदारसंघात १०० ते हजार मतांनी भाजप जिंकला आहे. मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी गाफिलपणा दाखवला. त्यामुळे त्यांनी विजय चोरला, नाही तर भाजपचा पराभव झाला होता. ३५ ते ४० मतदारसंघ देशातील असे होते, त्यात पाच ते सहा लाखाची मते चोरून विजय मिळवला आहे. या प्रकारचे उद्योग विधानसभेत मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.