तुम्ही मोदींजींना विचारलं तर तेही म्हणतील, मैं संजय राऊत के घर के सामने रहता हुँ, वाचा नेमका किस्सा?

बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात सामान्यातल्या सामान्य माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं मी बाळासाहेब ठाकरेंसोबत सलग 30 वर्ष काम केलं, मात्र, पुढील पिढीनं हे काम पुढं नेलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतला पत्ता सांगताना मी नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहतो, असं सांगितलं.

तुम्ही मोदींजींना विचारलं तर तेही म्हणतील, मैं संजय राऊत के घर के सामने रहता हुँ, वाचा नेमका किस्सा?
संजय राऊत नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 2:14 PM

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये आज संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी करताना आगामी काळातली सेनेची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. संजय राऊत यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात सामान्य घरातील युवकांना राजकारणात आणलं, असं म्हटलं. बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात सामान्यातल्या सामान्य माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं मी बाळासाहेब ठाकरेंसोबत सलग 30 वर्ष काम केलं, मात्र, पुढील पिढीनं हे काम पुढं नेलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतला पत्ता सांगताना मी नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहतो, असं सांगितलं.

मैं संजय राऊत के घर के सामने रहता हुँ,

मी अनेक वर्ष दिल्लीत राहतो, सफदरजंग लेनला राहतो.दिल्लीतील सर्वात प्रथितयश भाग आहे तो, शिवाजीराव आढळराव पाटील यांना माहिती आहे. मी माझा पत्ता सांगताना काय सांगतो नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात. रस्ता ओलांडला की समोर ते राहतात, ही शिवसेनेची कृपा आहे. देशाची राजधानी इतकी मोठी तिथं लोकं आपल्यालाला ओळखतात. मी सांगतो नरेंद्र मोदीजी के सामने रहता हूं, अगर उनको पुछोगे नरेंद्र मोदी को तो वह कहेंगे मै संजय राऊत के सामने रहता हूं, असं सजंय राऊत मिश्किलपणे म्हणाले.

मामा वरेरकर म्हणायजे जवाहरलाल माझ्यासमोर राहायचे

संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी मामा वरेरकर नावाचे खासदार होते जुने फार, ते राष्ट्रपती नियुक्त खासदार दोन वेळा झाले होते. त्यांना कुणी विचारलं कुठं राहता तर जवाहलाल म्हणजेच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु माझ्या समोर राहतात, असं सांगायचे हा किस्सा संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमधील सभेत सांगितला. नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती.

55 आमदारांवर मुख्यमंत्री, मग 50 नगरसेवकांवर महापौर का नाही?

राऊत म्हणाले, महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… पण मी मागे म्हटल्याप्रमाणे 55 जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमची अत्यंत माफक अपेक्षा आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सेनेचा महापौर बसलाच पाहिजे

महाविकासआघाडी आहे सगळ्यांना थोडा थोडा वाटा मिळाला पाहिजे तर त्यात आम्हालाही मिळाला पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहराचा महापौर जर शिवसेनेचा असला पाहिजे, अशी जर आपण अपेक्षा केली तर त्यात चुकीचं काय? पुण्याच्या महापौर शिवसेनेचा असावा असं वाटतंय तर त्यात आपलं चुकलं काय?, असंही राऊत म्हणाले.

अजित पवार ऐकत नाहीत, मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत

पुणे जिल्ह्यात आपलं कोण ऐकत नाही असं काही जण सांगतात… मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही ऐका, नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? मुख्यमंत्री हे दिल्लीचा अंदाज घ्याला गेलेत कारण दिल्ली वर आपल्याला राज्य करायचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले. आपल्याला कुठल्याही पक्षाने गृहित धरु नये, असा त्यांच्या बोलण्याचा एकंदरित रोख असावा, अशी चर्चा आहे.

इतर बातम्या:

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे’, संजय राऊतांनी बालेकिल्ल्या जाऊन अजितदादांना डिवचलं

VIDEO: महापालिकेतही आघाडी होणार का? राऊत भरसभेत म्हणाले, स्वाभिमानाशी तडजोड होणार नाही?

Sanjay Raut Said he live at Delhi in front of residence of PM Narendra Modi

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.