अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, राऊतांचं थेट आव्हान?

पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. (sanjay raut taunt ajit pawar over cm uddhav thackeray delhi tour)

अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, राऊतांचं थेट आव्हान?
sanjay raut
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:38 PM

पिंपरी चिंचवड: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे राऊत यांचं राष्ट्रवादीला हे थेट आव्हानच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. (sanjay raut taunt ajit pawar over cm uddhav thackeray delhi tour)

संजय राऊत आज पिंपरी चिंचवडला आहेत. पुणे जिल्ह्यात आपले कोण आयकत नाही असं काही सांगतात. असं कसं? मुख्यमंत्री आपले आहेत. अजित पवारही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यांना सांगू आमचेही ऐका. नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत? असं राऊत यांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर राऊत यांनी लगेच सारवासारव करण्यास सुरुवात केली. बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली.

आपलाच महापौर झाला पाहिजे

दिल्लीमध्ये मी राहतो. लोकांना मी पत्ता सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासमोर राहतात. त्यामुळे लोक मलाही ओळखतात. ही शिवसेनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. आता भोसरीमध्ये मेळावा सुरू आहे. स्टेजवर मोठी गर्दी जमली आहे. मात्र, भोसरी भागात एकही नगरसेवक आपला निवडणून आला नाही ही खंत आहे. या स्टेजवर बसलेल्यांनी प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत आपली सत्ता येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपलाच महापौर होईल. त्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राऊत यांनी केलं. महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. नुसतं पद आहे म्हणून नाही तर शिवसैनीकच्या मनगटात ताकद आहे म्हणून आपली सत्ता आहे, असंही ते म्हणाले.

दादांना आव्हान

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ही टीका केली. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला की कोथरूडमध्ये आला आपल्याला काही फरक पडत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.

तर तुमच्याशिवाय

मागील वेळेस 4 च्या प्रभागाचा फटका आपल्याला बसला. तसा त्यांना का बसला नाही? आपल्याला फटका बसला यांचा अर्थ आपलं संघटन कमी पडले, असं ते म्हणाले. आपल्याला सगळ्या जगावर लढण्याची सवय आहे. आलात तर आमच्या सोबत नाही तर तुमच्या शिवाय आम्ही लढू, असा इशाराही त्यांनी दिला. (sanjay raut taunt ajit pawar over cm uddhav thackeray delhi tour)

संबंधित बातम्या:

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, किरीट सोमय्यांचं महाविकास आघाडीला आव्हान

नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा फॉर्म्युला ठरला; वर्षा गायकवाड आणि पालिका आयुक्तांच्या चर्चेतून निघाला मार्ग

(sanjay raut taunt ajit pawar over cm uddhav thackeray delhi tour)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.