AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया काय, मस्साजोगवासीयांना केले मोठे आवाहन, ग्रामस्थांचे उपोषण सुटणार?

Ujjwal Nikam First Reaction : मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सातपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Deshmukh Case : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया काय, मस्साजोगवासीयांना केले मोठे आवाहन, ग्रामस्थांचे उपोषण सुटणार?
संतोष देशमुख, उज्ज्वल निकम
Follow us
| Updated on: Feb 26, 2025 | 12:15 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येला 76 दिवसांचा कालावधी उलटूनही ठोस असे काही हाती आलेले नाही. प्रत्येकवेळी आंदोलन, जनरेट्यानंतरच सरकार जागे झाल्याचे दिसून आले. आता या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासह इतर सात मागण्यांसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी सातपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ग्रामस्थांना मोठे आवाहन केले आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली. याविषयी निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की, आपण या खटल्याचं कामकाज बघावं पण त्यांना मी नम्रपणाने काही कारणास्तव नकार दिला होता. त्याची कारणं देखील त्यांना विषद करून सांगितली होती. पुन्हा कालपासून मी ग्रामस्थांचा जो अन्न त्यागाचा त्यांनी आंदोलन केलं आहे ते बघून व्यथीत झालो. माझ्या नियुक्तीसाठी आणि इतर काही मागण्यासाठी त्यांनी उपोषणाला बसावं ही निश्चित चांगली गोष्ट नाही. त्यांचा विश्वास सरकारवर आहे. मुख्यमंत्री आणि माझ्यावरती आहे. मुख्यमंत्र्यांशी काल मी बोललो आणि सदर खटला चालवण्यासाठी माझी संमती त्यांना कळवली. त्याप्रमाणे त्यांनी नियुक्तीचे आदेश काढण्याचा आज आपल्याकडूनच मला कळलं आहे.”, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

ग्रामस्थांना केले मोठे आवाहन

“मी ग्रामस्थांना एक आश्वासित करू इच्छितो कायदा या जगात देशात मोठा आहे. आणि कायदा मोठा असल्यामुळे न्याय प्रत्येकाला मिळतोच. म्हणून माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा. निश्चितपणे यावेळी केव्हा आरोप पत्र दाखल होईल त्यावेळेला हा खटला जलद गतीने चालविण्यात येईल.” असे आश्वासन त्यांनी दिले.

देशमुख कुटुंबियांची काय प्रतिक्रिया

जशी त्यांनी आमची एक मागणी पूर्ण केली तशा पुढच्या मागण्या सुद्धा पूर्ण केला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करते, असे वैभवी देशमुख म्हणाली. तर गावकऱ्यांनी काहीतरी आंदोलन केलं किंवा देशमुख कुटुंबियांनी पाऊल उचल तर या न्यायाचा लढा पुढे सक्रिय झाल्या सारखा वाटत. आंदोलन केल्याचे मागणी पूर्ण होते हा योगायोग आहे की कोण घडवून आणतय हेच कळत नाही. आज त्यांनी एक मागणी पूर्ण केले आहे आम्हाला कुठेतरी वाटतं की ते आमच्या मागण्या पूर्ण करतील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, असे वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केले.

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.