AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : ही हिंमत येते कुठून? पोस्टमार्टम रिपोर्टसाठी डॉक्टरनं पोलिसांकडेच 20 हजाराची लाच मागितली, डॉ. एन. पी. झंझाड अडचणीत

डॉ. झंझाड यांच्या या कार्यपद्धतीला पोलिसांनी आता आक्रमकपणे उत्तर द्यायचे ठरवले आहे. याप्रकरणी पोलीस खात्याने आता एक पत्र काढले आहे. त्याद्वारे लाचेची मागणी करणाऱ्या डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pune : ही हिंमत येते कुठून? पोस्टमार्टम रिपोर्टसाठी डॉक्टरनं पोलिसांकडेच 20 हजाराची लाच मागितली, डॉ. एन. पी. झंझाड अडचणीत
ससून रुग्णालय, पुणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 3:03 PM

पुणे : मृताचा अंतिम अहवाल देण्यासाठी पोलिसांकडेच लाच (Bribe) मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील शासकीय रुग्णालय असलेल्या ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) हा प्रकार घडला आहे. न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. पी. झंझाड असे लाच मागणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने या प्रकाराला वाचा फोडली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉ. झंझाड यांनी मृत व्यक्तीचा मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि 5 हजार रुपये दिल्यानंतर अंतिम अहवाल दिला होता. दरम्यान, डॉ. झंझाड यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशी लाचेची मागणी केल्याचे पोलिसांचे (Pune Police) म्हणणे आहे. झंझाड हे नेहमीच अहवाल देण्यापूर्वी काहीतरी कारण सांगून लाच मागतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.

काय घडलं होतं?

एका 29 वर्षीय तरुणाचा मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉ. झंझाड यांनी लाचेची मागणी केली. डोक्याच्या आत झालेल्या जखमा असे कारण दिले. आता हे कारण दिले तर विलंब आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा लागेल, त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित मृत व्यक्ती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. झंझाड यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी वीस हजार रुपये मागितले. शेवटी पाच हजारांवर तडजोड झाली आणि त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट दिला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी काढले पत्र

डॉ. झंझाड यांच्या या कार्यपद्धतीला पोलिसांनी आता आक्रमकपणे उत्तर द्यायचे ठरवले आहे. झंझाड हे नेहमीच पैशांची मागणी करून अडवणूक करतात. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी प्रत्येकवेळेला 100 रुपये द्यावे लागतात आणि न दिल्यास काहीतरी कारण सांगून परत पाठवतात. त्यामुळे पोलीसही वैतागले आहेत. याप्रकरणी पोलीस खात्याने आता एक पत्र काढले आहे. त्याद्वारे लाचेची मागणी करणाऱ्या डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.