तस्करांनी डोकं चालवलं, तस्करीसाठी केला रुग्णावाहिकेचा वापर, पण पोलिसांनी सापळ्यात अडकवलं
Satara News : सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने धडक कारवाई करत कोट्यवधींची होणारी उलटीची तस्करी पकडली आहे. ही उलटी सोन्यापेक्षाही महाग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
सातारा : चोर, तस्कार वेगवेगळ्या आयडिया शोधत असतात. पोलिसांपासून बचाव करण्यात ते कधी यशस्वी होतात. परंतु शेवटी पोलीस तर पोलीसच असतात. तस्करांनी किती आयडिया शोधल्या तरी त्या नेस्तानबूत करण्याचे काम पोलीस करत असतात. सातारा पोलिसांनी अशीच कामगिरी केली. या ठिकाणी तस्कर तस्करीसाठी चक्क रुग्णावाहिकेचा आधार घेत होते. परंतु तस्कारींची ही आयडिया पोलिसांनी चालू दिली नाही. कोट्यवधीची तस्करी करणाऱ्या या तस्करांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
काय आहे प्रकार
हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या ४ जणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तस्करांकडून ५ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. व्हेल माश्याच्या उलटीच्या तस्करीसाठी ते चक्क अँबुलन्सचा वापर करत होते. पोलिसांना तस्कारांच्या या आयडियाची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत चार जणांना अटक केली.
एलसीबीने केली कारवाई
सातारा LCB ने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे गावाजवळ ही कारवाई केली. पोलिसांना वाढे गावाजवळ व्हेल माशाच्या उलटीची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. मग पोलिसांनी सापळा रचत चौघांना अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या उलटीला रुपये किंमत कोट्यवधी आहे.
का वापरता व्हेल माशांची उलटी
व्हेल माशांच्या उलटीचा वापर नैसर्गिक परफ्युम्स बनवण्यासाठी केला जातो. महागडे सुगंधी उत्पादने बनविण्यासाठी तिचा वापर होतो. अनेक मोठे नामांकित परफ्युम ब्रॅन्ड्स या अँबरग्रीस म्हणजे उलटीचा होतो. बाजारात याला उलटीला कोट्यवधीची किंमत आहे.
का आहे कोट्यवधींची किंमत
व्हेल मासा समुद्रातील अनेक गोष्टी खातो. परंतु त्याला या गोष्टी न पचवता आल्याने उलटी करतो. ही उलट राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ आहे. एक प्रकारे ते मेणापासून बनवलेल्या दगडासारखा घन पदार्थ आहे. याला समुद्रातील तरंगते सोने म्हटले जाते. स्पर्म हा पदार्थ व्हेलच्या पोटात असतो. तो उलटीतून बाहेर पडतो. स्पर्मचा वापर औषधात, सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठीही वापर केला जातो. उलटीचे वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. परफ्युमची निर्मिती करणाऱ्या कंपन्या उलटीचा वापर करतात.