Rain : राज्यात आता कुठे होणार पावसाचा जोर कमी, आयएमडीने दिले अपडेट

Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. या दरम्यान राज्यात कुठे अन् कसा पाऊस पडला, यासंदर्भातील माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच पुढील चार-पाच दिवसांत कुठे जोर कमी होणार आहे...

Rain : राज्यात आता कुठे होणार पावसाचा जोर कमी, आयएमडीने दिले अपडेट
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 12:22 PM

पुणे : देशभरात मान्सून दाखल झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. हवामान विभागाने शनिवारी कोकणासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. परंतु त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यानंतर रविवार, सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात कोणताही अलर्ट दिलेला नाही. विदर्भात पुढील पाच दिवस यलो अलर्ट दिला आहे.

आतापर्यंत कसा झाला पाऊस

राज्यात २५ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर विदर्भ वगळता इतर ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात अजून मोठ्या पावसाची गरज असल्याचे टि्वट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरात धुंवाधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर धुंवाधार पाऊस सुरु आहे. पंचगंगेची पाणीपातळी 18 फुटांवर पोहचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. कोल्हापूरची तहान भागवणाऱ्या राधानगरी धरणात 35.56 टक्के पाणीसाठा झाला आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरुन वाहत आहे. राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, सुर्वे, तेरवाड, शिरोळ हे ७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

लोणावळ्यात पावसाचा कहर

पुण्यातील लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरलाय. गेल्या चोवीस तासांत 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेली चार दिवस लोणावळ्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र शुक्रवारपासून पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा पावसाने उशीरा लावला असला तरी आजच्या दिवसापर्यंत 907 मिमी इतका पाऊस झाला आहे.

गेल्या 24 तासांतील कोल्हापूर धरण क्षेत्रातील पाऊस

  • राधानगरी धरण क्षेत्र- ८८ मिमी
  • दूधगंगा धरण क्षेत्र- ६७ मिमी
  • कुंभी धरण क्षेत्र- १०३ मिमी
  • पाटगाव धरण क्षेत्र- १५१ मिमी
  • कडवी धरण क्षेत्र- १३५ मिमी
  • तुळशी धरण क्षेत्र- ५१ मिमी
  • कासारी धरण क्षेत्र- ८८ मिमी
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.