सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अभाविपच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार, तोडफोडीचा आरोप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभाविपचे कार्यकर्ते सोमवारी (22 फेब्रुवारी) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ इमारतीमध्ये तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. अभाविपनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध केला होता अभाविपचे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये घुसून आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली होती. (Savitribai Phule Pune University Administration register complaint against ABVP Protesters for Protest in Management Council meeting)
विद्यापीठ प्रशासनाची पोलिसात तक्रार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ इमारतीमध्ये तोडफोड केल्याचं आरोपही त्यांचावर लावण्यात आलाय. विद्यापीठ प्रशासनानं अभाविपने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत त्यांना लेखी पत्र देण्यात आल्याचे कळवले आहे. विद्यापीठाने परीक्षा न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून आंदोलन केले होते.
विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नसल्याचा अभाविपचा आरोप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये कोणत्याही विद्यार्थी हिताच्या विषयांवर चर्चा नाही, असा आरोप करण्यात आला. गेले 6 महिने परीक्षा शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत, त्याच्यावर आजून कोणताही निर्णय नाही. हा आरोप देखील करण्यात आला.
स्वायत्तेतवर गदा तरी विद्यापीठ गप्प का?
विद्यापीठाच्या स्वायत्तत्तेवरती शासनाकडून गदा आणली जात आहे आणि विद्यापीठ यावर गप्प आहे, असा सवालही अभाविपनं केला. विद्यार्थ्यांच्या पैशांवर राजकीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठां ऑनलाइन परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करावा अन्यथा ही बैठक करण्याचा अधिकार नाही, अशी टीका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली.
ABVP चं पुणे विद्यापीठात आंदोलन, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घोषणाबाजीhttps://t.co/8ERHnzaAUI#pune |#abvp | #SPPU | #puneprotest | #educationnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या:
ABVP चं पुणे विद्यापीठात आंदोलन, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घोषणाबाजी
online exams | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तांत्रिक अडचण मिटली, परीक्षेची नवी तारीख जाहीर
(Savitribai Phule Pune University Administration register complaint against ABVP Protesters for Protest in Management Council meeting)