SPPU website hacked | अवघ्या…3 मिनिटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक ; संकेतस्थळातील त्रुटी उघड, डाटाच्या सुरक्षेसाठी समिती नेमण्याची मागणी
विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक केल्यानंतर श्रेयस म्हणाला, 'की या ऑनलाईन प्रणालीत अनेक त्रुटी आहेत.व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेता या त्रुटी दार करणे आवश्यक आहे. अन्यथा खो विद्यार्थी, प्राध्यापकांची माहिती, संवेदनशील डेटा याला धोका निर्माण होऊ शकतो असे मत त्याने व्यक्त केले.
पुणे – ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. याच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ (website) अवघ्या तीन मिनिटात एथिकल हॅकरने हॅक (Ethical hacker)केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं
फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या एथिकल हॅकर असलेल्या श्रेयस गुजर या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक केलं. विद्यापीठाच्या ऑनलाईन प्रणालीत त्रुटी असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यानुसार त्याने कुलगुरूंचे प्रणालीतील खाते हॅक करून ई-मेलद्वारे ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनासही आणून दिली. संबधित घटनेबाबत विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर हॅकर श्रेयसने स्वतः डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेण्यात आली व प्रणालीतील त्रुटी दुरुस्त करण्यात आली.
एथिकल हॅकर श्रेयस गुजर कोण? श्रेयस गुजर हा एथिकल हॅकरया असून तो फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. श्रेयसने हॅकिंगबाबत केंद्र सरकार व विविध कंपन्यांच्या सोबत काम केलं आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक केल्यानंतर श्रेयस म्हणाला, ‘की या ऑनलाईन प्रणालीत अनेक त्रुटी आहेत.व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेता या त्रुटी दार करणे आवश्यक आहे. अन्यथा खो विद्यार्थी, प्राध्यापकांची माहिती, संवेदनशील डेटा याला धोका निर्माण होऊ शकतो असे मत त्याने व्यक्त केले आहे. ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी दूरकरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्रुटी दूर करणार श्रेयस गुजरने विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी दाखवून दिली ही खरी गोष्ट आहे. त्याने दाखवून दिलेल्या त्रुटींची विद्यापीठ प्रशासनानं दाखल घेतली आहे. त्रुटीच्या अनुषंगाने संपूर्ण प्रणालीच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात येईल. . बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.
डेटा सुरक्षेसाठी तात्काळ समितीची नेमणूक करण्यात यावी सद्या राज्यातील आरोग्य भरती,टीईटी,म्हाडा अशा सर्वाच पेपरफुटीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. यात प्रशासकीय अधिकारी कश्या प्रकारे सामावलेले होते हे सुद्धा अनुभवले आहे. तशाच प्रकार विद्यापीठातील डाटा सुरक्षितेबाबत घडला आहे..धक्कादायक घटना अशी घडली की,विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक केले ही गंभीर बाब असून विद्यापीठ याबाबत अनभिज्ञ होते.सद्यस्थितीला कोरोनामुळं विद्यापीठाच्या आँनलाईनच परीक्षा होणार आहेत.असा प्रकार पुन्हा होवू नये.उपाय योजना तातडीने कराव्यात. विद्यापीठाच्या बाह्य सौंदर्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करते मात्र द्यार्थीच्या डाटा सुरक्षितवर एवढे हलगर्जीपणा का बाळगत आहे? संकेतस्थळावरील डेटा सुरक्षेसाठी तात्काळ समितीची नेमणूक करण्यात यावी अशे मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हँड या विद्यार्थी संघटनेने केली आहे.
IND vs SA, 3rd ODI, LIVE Cricket Score: सीरीजमध्ये आज प्रतिष्ठा वाचवण्याचं टीम इंडियापुढे चॅलेंज
MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?