एखादा हॉरर चित्रपटांमध्ये हवेत तरंगणारे व्यक्ती तुम्ही पाहिली असणार. चित्रपटामधील ते दृश्य अंगावर रोम उभे करतात. त्याच पद्धतीचा प्रकार पुणे शहरातील एका शाळेत घडला आहे. युजर्सने पुणे शहरातील शाळेचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ कितपत खरा आहे?, बेशुद्ध असताना हवेत अर्धवट तरंगण्याचा प्रकार काय आहे? यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. काही जणांनी त्याला ओपिस्टोटोनसचा प्रकार म्हटला आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे हा प्रकार घडल्याचे एका युजर्सने म्हटले आहे. या विषयावर चांगली चर्चा रंगली आहे.
‘सुहित_जाधव’ या युजर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओबद्दल त्याने म्हटले आहे की, माझ्या शाळेतील ही मुलगी आहे. भूतबाधा झाल्याप्रमाणे ती हवेत तरंगत होती. त्याने इन्स्टाग्रॉम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही तासांमध्ये चांगलाच व्हायरल झाला. त्याच्यावर चर्चा रंगू लागली.
व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये मुलगी दिसत आहे. बेशुद्ध असलेली ही मुलगी वर्गात अर्धवट हवेत तरंगताना दिसत आहे. तिचे तिच्या शरीरावर काहीच नियंत्रण नाही. तिला तिचे वर्गमित्र सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण तिला पकडतात. हा प्रकार पुणे शहरात कुठे घडला आहे, हे मात्र दिले नाही.
अनेकांनी हा प्रकार भूतबाधा नाही, असे स्पष्ट केले आहे. त्या मुलीस काही तरी आजार झाला असणार, असा हा प्रकार आहे. काही जण म्हणतात, ती ज्या बाकावर बसली आहे, त्याचा आधार घेत उठण्याचा प्रयत्न करत आहे. काहींनी ती मुलगी नाटक करत असल्याचा दावा केला आहे. काही युजर्सने मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले की, त्या मुलीचा होमवर्क झाले नसणार. दुसऱ्याने म्हटले आहे, टीजर्सने सरप्राईज टेस्ट घेण्याचे म्हटले असेल…