जि.प. शाळेतील मुलांना शिक्षकाने मिरच्या खाऊ घातल्या, भात दप्तरात भरला…आरोपावर सरपंच म्हणतात…

| Updated on: Dec 18, 2024 | 7:33 PM

School: आम्ही एक दिवस शाळेत आलो नाही. त्याचा राग त्यांना आला. त्यांनी पोषण आहारातील भात खाल्ला. त्यानंतर हात धुतले. तो भात आमच्या दप्तरात टाकला. आम्ही बाहेर गेलो असताना त्यांनी हा प्रकार केला, असे एका विद्यार्थीनीने सांगितले.

जि.प. शाळेतील मुलांना शिक्षकाने मिरच्या खाऊ घातल्या, भात दप्तरात भरला...आरोपावर सरपंच म्हणतात...
School
Follow us on

काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीण चर्चेत आले होते. माळीण गावात दरड कोसळून 151 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. 30 जुलै 2014 रोजी घडलेल्या या घटनेतून गावकरी अजूनही सावरले नाही. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेतील चिमुकल्या मुलांना शिक्षकाने मारहाण करत तिखट मिरची खायला लावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाची माळीणवासीयांनी तक्रार करुन दखल घेतली गेली, उलट शिक्षकालाच पाठिशी घालण्याचा प्रकार घडला आहे, असा आरोप

काय आहे आरोप

2014 मध्ये माळीणमध्ये घडलेल्या दुर्घटनेत अनेकांनी कुटुंब उद्धवस्त झाली आहे. त्यातून वाचलेली कुटुंब उभारी घेत आहे. परंतु शिक्षणाच्या ज्ञान मंदिरात चिमुकल्या मुलांना जिल्हा परिषदेचे शिक्षक राहुल हिवरे यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तसेच स्वत: वडापाव खावून शिल्लक राहिलेली तिखट मिरची मुलांना खायला लावली. हा प्रकार येथच थांबला नाही. पोषण आहारातील भात मुलांच्या दप्तरात टाकला गेला आहे. तसेच तंबाखू मुलांच्या डोक्यावर टाकण्याचा प्रकार शिक्षक राहुल हिवरे करत असल्याचे विद्यार्थी सांगत आहे. तसेच मद्यपान ते करत असल्याचा आरोपही करत आहे.

विद्यार्थी काय म्हणतात…

शिक्षक राहुल हिवरे यांच्यासंदर्भात बोलताना मुले म्हणाली, आम्ही एक दिवस शाळेत आलो नाही. त्याचा राग त्यांना आला. त्यांनी पोषण आहारातील भात खाल्ला. त्यानंतर हात धुतले. तो भात आमच्या दप्तरात टाकला. आम्ही बाहेर गेलो असताना त्यांनी हा प्रकार केला, असे एका विद्यार्थीनीने सांगितले. एक विद्यार्थी म्हणाला, सर वडा पाव आणतात. ते वडापाव खातात आणि त्यात राहिलेल्या मिरच्या आम्हास खाण्यास लावतात.

हे सुद्धा वाचा

पालकांकडून नाराजी

शिक्षक राहुल हिवरे यांच्या प्रकाराबाबत पालक म्हणतात, मुले घरी येऊन रडत होते. त्यांना विचारल्यावर सांगतात शिक्षक मिरची खाण्यास भाग पडतात. नाहीतर मारतात. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीनंतर पालक शाळेत गेले. तेव्हा राहुल हिवरे शाळेत लपून राहिले. आमच्या समोर आले नाहीत. मिरची खावून एखाद्या मुलास काही झाले तर जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न मुलांच्या पालकांनी उपस्थित केले.

सरपंच म्हणतात, शिक्षण विभागाकडे तक्रार

माळीणचे सरपंच रघुनाथ झांजरे यांनी सांगितले की, मुलांनी शिक्षक मारतात. मिरची खावू घालतात. दारु पिऊन येतात, अशी तक्रार मिळाली आहे. या प्रकरणी तक्रार करुनही शिक्षकाला शिक्षण विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.