School start in maharashtra : किलबिलाट..! राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू; शिक्षण विभागानं कोरोनासंबंधी काय सूचना केल्या? वाचा…

मागील दोन दिवसांपासून स्वच्छता त्याचप्रमाणे कोरोना (Corona) प्रतिबंधक आवश्यक त्या उपाययोजना शाळा प्रशासनातर्फे करण्यात आल्या. शिक्षण विभागानेही सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज विद्यार्थी आपल्या आवडत्या शाळेत रमणार आहेत.

School start in maharashtra : किलबिलाट..! राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू; शिक्षण विभागानं कोरोनासंबंधी काय सूचना केल्या? वाचा...
शाळा सुरू झाल्यानंतरचे मुंबईच्या शाळेतले दृश्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:50 AM

पुणे : चिमुकल्यांचा शाळेतला किलबिलाट आजपासून ऐकायला मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्याची वाट विद्यार्थी (Students) पाहत होते. एकतर कोविडमुळे मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना इच्छा नसताना घरी बसून शिकावे लागले होते. त्यानंतर मध्येच सुरू, मध्येच बंद यामुळे अभ्यासावरही त्याचा परिणाम होत होता. आता पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यभरात शाळा (School starts) सुरू होत असल्याने शाळा प्रशासनानेदेखील योग्य ती खबरदारी घेतलेली दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून स्वच्छता त्याचप्रमाणे कोरोना (Corona) प्रतिबंधक आवश्यक त्या उपाययोजना शाळा प्रशासनातर्फे करण्यात आल्या. शिक्षण विभागानेही सूचना केल्या होत्या. त्यानंतर आज विद्यार्थी आपल्या आवडत्या शाळेत रमणार आहेत.

विदर्भात 29 जूनपासून वर्ग भरणार

शालेय शिक्षण विभागाने निर्देश दिले होते. त्याप्रमाणे 13 आणि 14 जूनरोजी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. तर 15 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. राज्यभरात ही परिस्थिती असताना विदर्भात शाळा काहीशा उशिरा सुरू होणार आहेत. येथील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. नियम तोच राहणार आहे. 27, 28 जूनला शाळा निर्जंतूक केल्या जाणार आहेत. तर दोन दिवसांनंतर म्हणजेच 29 जूनपासून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना गरजेच्या

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस त्याचप्रमाणे बुस्टर डोस घेण्याबाबत विभाग स्तरावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. 12 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. शाळेचा परिसर तसेच वर्गांत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणतेही कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास किंवा, ताप, खोकला असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याच्या सूचना पालकांना करायच्या आहेत. त्याचबरोबर अशा लक्षणाचे विद्यार्थी असल्यास त्वरीत शाळेतच विलगीकरणाची व्यवस्था असावी, त्यांची कोविड टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध असावी, अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.